Full Width(True/False)

Photos: सिनेमातील दिग्गज खलनायकांची मुलं सध्या करतात काय?

मुंबई : हिंदी सिनेमामध्ये खलनायकाचे एक वेगळे महत्त्व आहे. सिनेमातील खलनायक जितका खतरनाक असेल तेवढा नायकावर जास्त दबाव असतो. हिंदी सिनेमात काम करणारे अनेक खलनायकांनी खूप लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे नायकांबरोबरच या खलनायकांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला त्यांचे चाहतेही उत्सुक असतात. हिंदी सिनेमसृष्टीतील अशाच काही खलनायकांबद्दल आणि त्यांच्या मुलांबद्दल आज जाणून घेऊ... अमरीश पुरी अमरीश पुरी हे हिंदी सिनेमातील सर्वाधिक गाजलेले खलनायक आहेत. मिस्टर इंडिया, नायक, गदर, दिलजले, नगिना, करन अर्जुन, तहलका, घायल यांसारखे अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये त्यांनी काम केले आहे. खलनायकांच्या भूमिकेबरोबरच त्यांनी व्यक्तिचरित्रात्मक भूमिकाही साकारल्या आहेत. अमरीश पुरी यांचा मुलगा राजीव पुरी सिनेसृष्टीपासून दूर असून ते मरीन नेवीगेटर म्हणून काम करतात. शक्ती कपूर यांनी खलनायकाची प्रत्येक भूमिका जीवंत केली आहे. त्यामुळेच ते ही लोकप्रिय खलनायक ठरले. खलनायकाच्या भूमिकेबरोबरच त्यांनी विनोदी भूमिकाही तितक्याच ताकदीने रंगवल्या आहेत. त्यांची मुलगी श्रद्धा कपूरने हिंदी सिनेमामध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. परंतु मुलगा सिद्धार्थ कपूरला फार काही यश मिळाले नाही. सिद्धार्थने पलटन, भूत, यारम आणि हसिना पारकर या सिनेमात काम केले आहे. डॅनी डेन्जोंगपा अभिनेता डॅनी डेन्जोंगपा यांनी आपल्या अभिनयाने हिंदी सिनेमासृष्टीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी प्रत्येक भूमिका समरसून साकारली. कांचा चीना, बख्तावर, कुदा बख्श सारख्या त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. डॅनी यांच्या मुलाचे नाव आहे रिन्जिंग डेन्जोंगपा असे असून लवकरच तो देखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत हिंदी सिनेमासृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. गुलशन ग्रोवर हिंदी सिनेमांमधील खलनायकांचा जेव्हा विषय निघतो तेव्हा तो गुलशन ग्रोवर यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. गुलशन ग्रोवर यांनी साकारलेली प्रत्येक नकारात्मक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गुलशन यांनी आतापर्यंत ४०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले असून बहुतांश सिनेमांत त्यांनी खलनायक साकारले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव संजय ग्रोवर असून तो ख्यातनाम उद्योगपती आहे. हिंदी सिनेमांच्या इतिहासामध्ये अमजद खान यांनी साकारलेली गब्बर ही भूमिका अजरामर झाली आहे. त्यांच्या मुलाने शादाब खाननेही सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला होता परंतु त्याला फारसे यश मिळू शकले नाही. शादाब खानने राजा की आएगी बारात सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. २०२० मध्ये रिलीज झालेली वेब सीरिज स्कॅम १९९२ मध्ये त्याने अजय केडिया ही भूमिका साकारली होती. ही भूमिका अनेक प्रेक्षकांन आवडली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nWltuh