नवी दिल्लीः GOQii ने आपला जबरदस्त फिटनेस बँड भारतात लाँच केला आहे. या फिटनेस बँडमध्ये हार्ट रेट सोबत SpO2 आणि ब्लड प्रेशरची लेवल तपासण्याचे सेन्सर दिले आहे. यासोबतच युजर्संना नवीन फिटनेस बँड मध्ये १७ एक्सरसाइज मोड आणि अमोलेड कलर डिस्प्ले दिला आहे. जाणून घ्या GOQii Vital 4 संबंधी सर्वकाही. वाचाः GOQii Vital 4 फिटनेस बँड हार्ट-रेट, ब्लड प्रेशर, ब्लड ऑक्सीजन आणि ब्लड ग्लूकोज मॉनिटर करण्यात सक्षम आहे. या फिटनेस बँड मध्ये १७ एक्सरसाइज मोड दिले आहेत. ज्यात वॉकिंग, रनिंग, सायकलिंग आणि क्रिकेट सारख्या गेमचा समावेश आहे. याशिवाय फिटनेस बँडला IP68 ची रेटिंग मिळाली आहे. याचाच अर्थ हे डस्ट आणि वॉटर प्रूफ आहे. वाचाः GOQii Vital 4 फिटनेस बँड मध्ये कलर डिस्प्ले आहे. याचे रिजॉल्यूशन 120x120 पिक्सल आहे. सोबत रिमाइंडर्स, अलार्म आणि कॉल मेसेज नोटिफिकेशनची सुविधा दिली आहे. याशिवाय, युजर्संना नवीन फिटनेस बँडमध्ये दमदार बॅटरी दिली आहे. जी नॉर्मल युजेस मध्ये ३ ते ४ दिवसांची बॅटरी बॅक अप देते. तर हार्ट रेट आणि टेंपरेचर बंद केल्यानंतर ७ ते ८ दिवसांची बॅटरी बॅक अप देते. वाचाः GOQii Vital 4ची किंमत फिटनेस बँडची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. हे बँड ब्लॅक, पर्पल आणि रेड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या फिटनेस बँडला अॅमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येऊ शकते. भारतीय बाजारात GOQii Vital 4 ला ऑनर बँड ५ ची जोरदार टक्कर मिळेल. ऑनर बँड ५ ची किंमत २ हजार ७९९ रुपये आहे. Honor Band 5 ला भारतीय बाजारात २ हजार २९९ रुपयांत लाँच केले होते. परंतु, आता त्याची किंमत २२९९ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3y25Bet