मुंबई : सोनी टीव्हीवरून प्रसारित होणारा हा रिअॅलिटी शो सर्वात लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत ए. आर. रहमान, जयाप्रदा, आनंदजी, जितेंद्र, एकता कपूर, धर्मेंद्र, हेमामालिनी, रेखा, नीतू कपूर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. तसेच देशातील गुणी गायकांचा शोध घेणाऱ्या या कार्यक्रमाच्या या पर्वामधील अरुणिता कांजीलाल, पवनदीप राजन,सवाई भट्ट यांच्यासह अनेक स्पर्धकांनी आपल्या आवाजाने अनेकांना भारून टाकले आहे. इंडियन आयडलच्या या पर्वासाठी नेहा कक्कर, हिमेश रेशमीया आणि परीक्षक म्हणून काम करत आहेत. हे परीक्षक एका भागासाठी तगडे असे मानधन घेतात. त्यांचे हे मानधन ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. विशेष म्हणजे तीनही परीक्षकांमध्ये गायिका सर्वाधिक मानधन घेते. नेहा एका भागासाठी ५ लाख रुपये इतके मानधन घेते. नेहाच्या खालोखाल संगीतकार विशाल ददलानी एका भागासाठी ४.५ लाख रुपये तर गायक आणि संगीतकार एका भागासाठी ४ लाख रुपये आकारतो. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक आदित्य नारायणला एका भागासाठी २.५ लाख रुपये घेतो. दरम्यान, करोनामुळे या कार्यक्रमामध्ये काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. त्यामध्ये कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायण याला करोनाची लागण झाल्यामुळे तो सुटीवर गेला होता. आता तो परत आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये कार्यक्रमांच्या शूटिंगवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमाचे शूटिंग राज्याबाहेर करण्यात येत आहे. यामुळे तीनही परीक्षक सहभागी होऊ शकणार नसल्याने त्यांच्या जागी अनु मलिक परीक्षक म्हणून काम बघणार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RBHGlt