Full Width(True/False)

Jio ची खास ऑफर, ३३० रुपयांमध्ये ३ महिने घ्या अनलिमिटेड कॉलिंग आणि डाटाचा लाभ

सध्या वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे. ग्राहकांना लक्षात घेऊन कंपन्या देखील अधिकाधिक डाटा असणारे प्लॅन्स आणत आहे. कालावधी जास्त असेल व अधिक डेटा मिळत असल्यास प्लॅन्सची किंमत देखील अधिक असते. असे प्लॅन्स सर्वांनाच परवडणारे नसतात. अनेक ग्राहक असे आहेत ज्यांना कॉलिंगची अधिक आवश्यकता असते व डाटा कमी वापरतात. अशा ग्राहकांसाठी , आणि व्हीआयचे खास प्लॅन्स आहेत, यात ग्राहकांना कमी किंमतीत अधिक कालावधी व फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. या प्लॅन्सविषयी जाणून घेऊया. वाचाः रिलायन्स जिओचा ३२९ रुपयांचा प्लॅन ग्राहकांना ३२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांचा कालावधी मिळतो. हा प्लॅन डाटापेक्षा कॉलिंगचा अधिक वापर करणाऱ्यांसाठी फायद्याचा आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये १००० एसएमएस देखील मिळतात. प्लॅनच्या कालावधीमध्ये कधीही याचा वापर करता येईल. याशिवाय यूजर्सला ६ जीबी डाटा यात मिळतो. सोबतच, जिओ अ‍ॅप्सच्या मोफत स्बस्क्रिप्शनचा देखील लाभ मिळतो. याच किंमतीच्या जवळपास व्हीआय आणि एअरटेल देखील असेच प्लॅन्स ऑफर करत आहे, त्याविषयी जाणून घेऊ. चा ३७९ रुपयांचा प्लॅन व्हीआयच्या या प्लॅनमधील बेनिफिट्स रिलायन्सच्या प्लॅनप्रमाणेच आहेत. यात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, १००० एसएमएस आणि ६ जीबी डाटा मिळतो. याशिवाय Vi Movies & TV Basic अ‍ॅपचे स्बस्क्रिप्शन दिले जात आहे. या प्लॅनचा कालावधी८४ दिवसांचा आहे. वाचाः एअरटेलचा ३७९ रुपयांचा प्लॅन एअरटेलच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, ९०० एसएमएस आणि ६ जीबी डाटा दिला जात आहे. याचा वापर प्लॅनच्या पूर्ण कालावधीमध्ये कधीही करता येईल. यासोबतच Xstream Premium अ‍ॅपचे मोफत स्बस्क्रिप्शन या प्लॅनमध्ये दिले जात आहे. तसेच, Prime Video च्या Mobile Edition चे मोफत ट्रायल, फ्री हेलोट्यून, विंक म्यूजिक, अपोलो अ‍ॅपचे स्बस्क्रिप्शन देखील मिळेल. या प्लॅनची वैधता ८४ दिवस आहे. तुम्हाला जर जिओच्या ३२९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत दुसरा प्लॅन शोधत असाल, तर तुम्ही १२९ रुपयांच्या प्लॅनचे रिचार्ज करु शकता. जिओचा १२९ रुपयांचा प्लॅन या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय ३०० एसएमएस व पूर्ण कालावधीसाठी २ जीबी डेटा देखील मिळेल. सोबतच, जिओ अ‍ॅप्सच्या मोफत स्बस्क्रिप्शनचा फायदा घेता येईल. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eX0R0L