नवी दिल्लीः जिओने एअरटेल, बीएसएनएल आणि वोडाफोन आयडियाला जोरदार टक्कर देण्यासाठी खूप सारे प्लान बाजारात उतरवले आहेत. या सर्व प्लानमध्ये हाय स्पीड डेटा आणि फ्री कॉलिंग ऑफर केली जाते. या प्लानची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः जिओचा १२५ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसांची वैधता मिळते. रोज ०.५ जीबी डेटा मिळतो. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. शिवाय, युजर्संना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज सारखे प्रीमियम अॅपचे सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः जिओचा १४९ रुपयांचा प्लान जिओचा हा प्रीपेड प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. या प्रीपेड प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा दिला जातो. युजर्संना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. युजर्संना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज सारखे प्रीमियम अॅपचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः जिओचा १५५ रुपयांचा प्लान जिओफोन युजर्स या प्लानचा वापर करू शकतात. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळतो. युजर्संना कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंग करता येऊ शकते. याशिवाय, जिओ सिनेमा, जिओ न्यूज सारखे प्रीमियम अॅपचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः जिओचा १९९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंग करता येऊ शकते. युजर्संना या प्लानमध्ये जिओ सिनेमा, जिओ न्यूज सारखे प्रीमियम अॅपचे सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33ZkK29