मुंबई- करोना काळात लोकांचा मसीहा म्हणून उदयास आलेला गेल्या एका वर्षापासून लोकांना सतत मदत करत आहे. २०२० मध्ये सुरू झालेल्या करोना साथीमुळे लॉकडाउन करण्यात आलं होतं. या दिवसांमध्ये सोनूने अनेक स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी सुखरुप सोडण्याचं उदात्त काम त्याने केलं होतं. त्या दिवसांपासून आजपर्यंत सोनू अविरतपणे लोकांना मदत देण्याचं काम करत आहे. गरजू व्यक्तीही सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूकडे मदत मागतात आणि अभिनेता त्यांना त्वरित मदत करतो. गरजूंना कोणती गरज आहे याकडे न पाहता त्यांच्या प्रत्येक अत्यावश्यक गरजा सोनू पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. एकदा का सोनूने हो म्हटलं की ती मदत गरजूपर्यंत पोहोचतेच. पण आश्चर्य म्हणजे सोनूच्या निःस्वार्थ मदतीवर काहीजण प्रश्न उपस्थित करतात. असेच काहीसे अलीकडे घडले पण सोनूने त्याला योग्य प्रत्युत्तर दिलं. खरं तर, सोनू सूदने यापूर्वी ओडिशाच्या गंजाम येथून मदत मागणार्याला मदत केली होती. त्यानंतर ट्वीट करत त्याने रुग्णाला मदत मिळाल्याचं सांगितलं. परंतु सोनूचं ट्वीट रिट्वीट करत गंजमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोनूची मदत चुकीची असल्याचं म्हटलं. त्यानंतर सोनूने रुग्णाच्या कुटुंबाशी व्हॉट्सअॅपवर केलेल्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर दिले. सोनूने ट्वीट करून लिहिले की, 'सर, आम्ही कधीही दावा केला नाही की तुम्ही आमच्याकडे मदत मागितली. आम्हाला गरजूंनी संपर्क साधला होता आणि आम्ही त्यांच्यासाठी बेडची व्यवस्था केली आहे. मी तुमच्यासाठी काही चॅट शेअर करत आहे. तुमचं कार्यालय खूप चांगलं काम करत आहात आणि तुम्ही पडताळणीही करू शकता की आम्हीही त्यांची मदत केली आहे. मी तुम्हाला मेसेजमध्ये त्यांचा नंबर पाठवला आहे. जय हिंद.' ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यामध्ये सोनूने केलेल्या ट्वीटचा स्क्रीनशॉट जोडण्यात आला होता. यात त्यांनी लिहिले की, 'सोनू सूद फाउंडेशन किंवा त्यांच्या टीमशी आमचा काही संपर्क झाला नाही. रुग्णाला घरात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे. बेडचा कधी प्रश्नच नव्हता. बहरामपूर महानगरपालिका त्यावर नजर ठेवून आहे. सीएमओ ओडिसा.' काही दिवसांपूर्वी लोकांनी सोनू सूदला निरपेक्ष मदत केल्याबद्दल ट्रोल केले होते. लोक म्हणायचे की सोनू कोणत्याही स्वार्थाशिवाय एवढी मदत का करत आहे. यावर त्याने चोख प्रत्युत्तर देत म्हटलं की, 'एखाद्याने त्याला खोटारडा म्हणणे म्हणजे असे झाले की भ्रष्ट अधिकाऱ्याने चांगलं काम करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासारखं आहे. अशा लोकांकडे लक्ष देऊन आपला वेळ वाया घालवायची माझी अजिबात इच्छा नाही.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3or6nx1