मुंबई : कौन बनेगा करोडपती या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमाच्या १३ व्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठीचा पहिला प्रश्न सोमवारी सोनी टीव्हीवरून विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर आज मंगळवारी देण्यात येणार आहे. केबीसी हा कार्यक्रम स्पर्धकांची बुद्धीमत्ता जोखणारा असतो. रजिस्ट्रेशनपासून १ कोटी रुपये जिंकण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेक्षकांच्या बुद्धीमत्तेचा कस लागतो. प्रत्येकाच्या बुद्धीला चालना देणारा असा हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात रजिस्ट्रेशनसाठी 'कोणाच्या सन्मानार्थ २३ जानेवारी हा दिवस भारत सरकारतर्फे 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला?' असा पहिला प्रश्न होता. या प्रश्नासाठी शहीद भगत सिंग, नेताजी सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे असे पर्याय दिले होते. केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी हे करा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर केवळ एसएमएस द्वारे अथवा सोनी लिव अॅपद्वारेच देता येऊ शकते. यात सहभागी होण्यासाठी कोणतीही फी नाही. लाइफ लाइन ऑडियन्स पोल नाही गेल्यावर्षी २८ सप्टेंबरला केबीसीचा १२ वा सिझन प्रसारित झाला होता. भोपाळची आरती जगताप ही पहिली स्पर्धक होती. करोनाच्या काळात हा गेम शो होत असल्यामुळे ऑडियन्स पोल ही लाइफ लाइन काढून टाकण्यात आली त्याऐवजी व्हिडीओ-ए- फ्रेंड ही लाइफ लाइन देण्यात आली. गेल्या सिझनमध्ये नाजिया नजीम यांनी १ कोटी रुपये जिंकले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uCqPh1