नवी दिल्ली. : दरवर्षी ११ मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस . दरवर्षी याच दिवशी उत्साहात साजरा केला जातो. या दिवसामागे एक अतिशय रंजक इतिहास दडलेला आहे. वाचा : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसचा इतिहास: ११ मे १९९८ हा भारतात यशस्वी अणुचाचणी घेण्यात आली होती . त्यानंतरच अण्वस्त्रे असलेल्या देशांच्या यादीत भारताचे नाव समाविष्ट झाले.११ मे १९९८ मध्ये भारताने ऑपरेशन शक्ती अंतर्गत राजस्थानच्या पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली. त्यानंतर १३ मे रोजी दोन विभक्त चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांचे नेतृत्व माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी केले. यानंतर ११ मे १९९९ रोजी प्रथमच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या दिवसाची घोषणा तत्कालीन पंतप्रधान अल बिहारी वाजपेयी यांनी केली होती. या दिवसापासून आजपर्यंत तंत्रज्ञान विकास मंडळाने तांत्रिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल शास्त्रज्ञ व अभियंत्यांचा सन्मान व प्रोत्साहन दिले आहे. वैज्ञानिक, डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था), भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) आणि एएमडीईआर (अणु खनिज संचालनालय अन्वेषण आणि संशोधन) यांनी यशस्वीरीत्या चाचणी केली. हेच कारण होते ज्यामुळे भारत थर्मोन्यूक्लियर शस्त्रे तयार करण्यास सक्षम बनू शकला. तसेच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या दिवशी हंस -१ हे या पहिल्या भारतीय विमानाने यशस्वी भरारी घेतली होती. त्याशिवाय डीआरडीओने त्याच दिवशी त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीही केली. हे एक क्षेपणास्त्र आहे जे त्याच्या लक्ष्यावर वेगाने हल्ला करते. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bi8pu4