नवी दिल्ली : ओप्पो इंडियाने आपल्या ओप्पो A53 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. भारतात दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला होता व आता या दोन्ही फोनच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. नवीन किंमतीसह Oppo A53 2020 फ्लिपकार्टवर खरेदी करता येईल. फीचर्सबद्दल सांगायचे तर Oppo A53 2020 मध्ये पंचहोल डिस्प्लेसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. Oppo A53 2020 थेट रिअलमी ६, सॅमसंग गॅलेक्सी एम३१ आणि रेडमी नोट ९ प्रो ला टक्कर देईल. वाचाः Oppo A53 2020 ची नवीन किंमत फ्लिपकार्टच्या लिस्टिंगनुसार, Oppo A53 2020 च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९० रुपये आहे, जी आधी १२९९० रुपये होती. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५४९० रुपये होती, जी आता १२९९० रुपये झाली आहे. हा इलेक्ट्रिक ब्लॅक, फेरी व्हाइट आणि फँसी ब्लू रंगात उपलब्ध आहे. ही नवीन किंमत फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेल पुरतीच मर्यादित आहे की कायमस्वरुपी आहे, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. Oppo A53 2020 चे स्पेसिफिकेशन Oppo A53 2020 मध्ये ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्यून ७२०X१६०० पिक्सल आहे. आस्पेक्ट रेशियो २०:९ आण रिफ्रेश 90Hz आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा यह स्मार्टफोन Android १० सोबत ColorOS ७.२ वर काम करतो. फोन ४GB/६४GB आणि ६GB/१२८GB या दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. मायक्रोएसडी कार्डने स्टोरेज २५६ जीबी पर्यंत वाढवता येईल. Oppo A53 2020 चा कॅमेरा फोनच्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सल आहे, तर इतर दोन कॅमेरे २+२ मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी यात f/2.0 लेंस सोबत16-मेगापिक्सल सेंसर आहे. Oppo A53 2020 ची बॅटरी Oppo A53 2020 स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएचची पॉवरफूल बॅटरी मिळेल. हा फोन १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस/ ए-जीपीएस, यूएसबी टाइप-C सोबत 3.5 मिलीमीटरचा हेडफोन जॅक मिळतो. याच्या पाठीमागच्या बाजूला फिंगरप्रिंट देण्यात आले आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vH6wPx