Full Width(True/False)

५१५० mAh बॅटरी, ६४ जीबी स्टोरेजचा फोन लाँच, किंमत फक्त ७३२४ रुपये

नवी दिल्ली. चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी उमिडीगीने फोन Umidigi A 11 ला कमी किंमतीत उत्कृष्ट फीचर्ससह लाँच केले आहे. उमिडिगीच्या या एंट्री लेव्हल फोनची सर्वात महत्वाची बाब म्हणजे तो ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला असून त्याची किंमत ७५०० रुपयांपेक्षा कमी आहे. उमिडिगी ए 11 जगभरात लॉन्च केले गेले असून त्याची किंमत ९९.९९ डॉलर्स इतकी आहे. उमिडिगी कंपनीचे फोनही भारतात विकले जातात. ' बियॉन्ड ड्रीम्स' ही उमिडिगी ए 11 ची टॅगलाइन आहे. वाचा : किंमत आणि व्हेरिएंट्स उमिडिगी ए ११ च्या किंमती आणि व्हेरिएंट्सबद्दल बोलायचे झाल्यास ते दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे, ३ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९९.९९ डॉलर्स म्हणजेच आहे म्हणजेच ७३२४ रुपये आणि ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत. ११९. ९९ डॉलर्स इतकी म्हणजेच ८७८९ रुपये आहे. हा फोन मिस्ट ब्लू आणि फॉरेस्ट ग्रे कलर ऑप्शन्समध्ये येतो. कंपनीने यूएमआयडीआयजी एअरबड्स यू देखील बाजारात आणली असून त्याची किंमत २४. ९९ डॉलर्स म्हणजेच १८३० रुपये आहे. मोठी बॅटरी आणि डिस्प्ले उमिडिगी ए ११ च्या स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे झाल्यास यात ६.५३ इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे, ज्याचा स्क्रीन रिझोल्यूशन ७२० × १६०० पिक्सल आहे. अँड्रॉइड ११ वर आधारित, या फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी २५ प्रोसेसर आहे. उमिडिगी ए ११ मध्ये ५१५०mAh बॅटरी आहे, जी १० डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फिंगरप्रिंट सेन्सर, इन्फ्रारेड थर्मामीटरने सुसज्ज या एंट्री-लेव्हल फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा अल्ट्राव्हायोलेट लेन्स आणि--मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा १६ मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Q2g6NA