नवी दिल्ली : कंपनी ने चीनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने स्मार्टफोनला लाँच केले असून, यात ६४ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ६६ वॉट रॅपिड चार्जिंग सपोर्टसारखे दमदार फीचर्स देण्यात आले आहे. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनला कंपनी चीनच्या बाहेर कधी लाँच करणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. या फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. वाचाः Honor Play 5 ची किंमत Honor Play 5 फोनला कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. याचा बेस व्हेरिएंट ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह येतो, ज्याची किंमत २,०९९ चीनी युआन (जवळपास २६ हजार रुपये) आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २,२९९ चीनी युआन (जवळपास २३,८०० रुपये) आहे. हा फोन जांभळ्या आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. वाचाः Honor Play 5 चे फीचर्स हा फोन Magic UI ४.० वर आधारित अँड्राइड १० वर काम करतो. यात ६.५३ इंचचा ओएलईडी फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझॉल्यूशन १०८०x२४०० आहे. फोनमध्ये डायमेंसिटी ८००U प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम मिळेल. यात २५६ जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी ३८०० एमएएच बॅटरी देण्यात आली हे, जी ६६ वॉट रॅपिड चार्जिंग सपोर्टसोबत येते. फोटोग्राफीसाठी यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सल आहे, दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, तिसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा मॅक्रो आणि चौथा कॅमेरा २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेंसर मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ५जी, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ ५.१, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक सारखे फीचर्स मिळतील. वाचाः वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3v2A8GX