नवी दिल्ली : लवकरच आपला लोकप्रिय फोन ला नवीन लूक आणि फीचर्ससह परत लाँच करण्याची शक्यता आहे. २००० ते २०१० या दशकात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला हा फोन पुन्हा विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा फोन यावेळी स्मार्टफोनच्या स्वरुपात असेल. सोबतच कंपनी ला देखील नवीन अवतारात सादर करू शकते. वाचाः नोकियाच्या या दोन्ही फोनचा लूक आकर्षक असल्याने २०१० च्या आधी यांचाच बोलबाला होता. आता एचएमडी हा जुना अनुभव परत देण्यासाठी हे दोन्ही फोन पुन्हा आणण्याची शक्यता आहे. नुकतेच SIRIM सह अनेक सर्टिफिकेशन साइटवर नोकियाच्या या दोन्ही स्मार्टफोन्सबाबत माहिती मिळाली आहे. यानंतर नोकिया ६६०० आणि नोकिय ३६६० पुन्हा येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टिपस्टर मुकुल शर्माने देखील सीरिम सर्टिफिकेशन साइटवर नोकियाच्या या दोन्ही फोन्सबाबत माहिती दिली. नोकियाचे हे दोन्ही फोन जाड होते व यांचे वजन देखील जास्त होते. स्मार्टफोन्स आल्यानंतर हे दोन्ही फोन मागे पडले. आता या फोन्सला स्वरूपात सादर केले जाण्याची शक्यता आहे. वाचाः नोकिया ६६०० च्या वैशिष्ट्यांबाबत सांगायचे तर यात २.१ इंच डिस्प्ले आणि कीपॅड देण्यात आले होते. या फोनचा लूक खूपच शानदार होता. यात०.३ मेगापिक्सल रियर कॅमेरा देखील मिळत असे. वर्ष २००३ मध्ये या फोनमध्ये केवळ ६ एमबी स्टोरेज मिळत असे. या फोनमध्ये ८५० एमएएच रिव्हूवेबल बॅटरी येत असेल. तर नोकिया ३६६० मध्ये २.१ इंच डिस्प्ले, ०.३ मेगापिक्सल रियर कॅमेरा मिळत असे. हा फोन २००३ साली लाँच करण्यात आला होता, त्यावेळी यात ३.४ एमबी स्टोरेज देण्यात आले होते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ey0fQe