Full Width(True/False)

Oppo चा नवा स्मार्टफोन लाँच, ५ मिनिट चार्जिंगमध्ये २ तासाचा बॅटरी बॅकअप

नवी दिल्लीः ओप्पो (Oppo) ने आपला जबरदस्त स्मार्टफोन ला लाँच केले आहे. हा फोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Oppo K7 5G फोनचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. सोबत हा फोन K सीरीजचा पहिला ५जी फोन आहे. या फोनमध्ये दमदार मिडरेंज, ६५ वॉटची फास्ट चार्जिंगसोबत याला लाँच केले आहे. अवघ्या ५ मिनिटात चार्ज करून बॅटरी दोन तास मिळेल, असा दावा केला जात आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. वाचाः Oppo K9 5G ची किंमत ओप्पोचा हा फोन सध्या चीनमध्ये लाँच केला आहे. Oppo K9 5G ची बेस व्हेरियंट ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत चीनमध्ये १८९९ चिनी युआन म्हणजेच २१ हजार ६०० रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुसऱ्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २१९९ चिनी युआन म्हणजेच २५ हजार रुपये आहे. या फोनला ब्लॅक आणि ग्रेडियंट कलर मध्ये आणले गेले आहे. या फोनची विक्री चीनमध्ये ११ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. वाचाः Oppo K9 5G चे फीचर्स ओप्पोच्या या फोनमध्ये ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोन अँड्रॉयड ११ वर आधारित कलर्स ११.१ वर काम करतो. सोबत फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅग ७६८ जीबी प्रोसेसर दिला आहे. सोबत Adreno 620 जीपीयू दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी 4,300एमएएच ची बॅटरी दिली आहे. सोबत ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट द्वारे हा फोन अवघ्या ३५ मिनिटात फुल चार्ज केला जाऊ शकतो. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vNqtUW