मुंबई: अनेक टीव्ही रिअलिटी शोमध्ये सहभागी झालेला त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. कधी त्याची लग्नं तर कधी दारू आणि ड्रग्स प्रकरण वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राहुल महाजन चर्चेचा विषय ठरतो. श्वेता सिंह आणि डिंपी गांगुली यांच्याशी लग्न आणि घटस्फोट झाल्यानंतर राहुलच्या आयुष्यात नतालिया इलिनाची एण्ट्री झाली. २०१८ मध्ये राहुलनं नतालियाशी लग्न केलं. नातालिया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिच्या सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत. लुकच्या बाबतीत तर नतालिया बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते. नतालियाच्या सोशल मीडियावर तिचे मॉडर्न कपड्यांसोबतच पारंपरिक भारतीय पेहरावातील फोटोही पाहायला मिळतात. विशेष म्हणजे दोन्ही प्रकारच्या लुकमध्ये नतालिया तेवढीच सुंदर दिसते. नतालिया ही मूळची कजाकिस्तानची आहे. राहुल महजननं तिच्याशी २०१८ मध्ये लग्न केलं. या लग्नात केवळ या दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. पण या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा मात्र खूप झाली होती. आपल्या तिसऱ्या पत्नीबद्दल एका मुलाखतीत राहुल महाजननं सांगितलं होतं की, नतालियानं धर्म परिवर्तन केलं आहे. या मुलाखतीत राहुल महाजन म्हणाला, 'आता नतालियानं हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. मी नेहमीच तिला शिव-पार्वतीबद्दल सांगत असतो. पती-पत्नीचं नातं हे नेहमीच शिव-पार्वतीसारखं असायला हवं असं मी तिला सांगतो.' राहुल आणि नतालिया यांच्या जवळपास १८ वर्षांचं अंतर आहे. जेव्हा या दोघांनी लग्न केलं त्यावेळी राहुल ४३ वर्षांचा होता तर नतालिया २५ वर्षांची होती. पण वयातील फरकाचा त्यांना नात्यावर काहीच परिणाम झालेला नाही असं राहुल म्हणतो. राहुल महाजनचं पहिलं लग्न श्वेता सिंहशी जालं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. दोघंही घटस्फोट घेत वेगळे झाले. त्यानंतर एका रिअलिटी शोच्या माध्यमातून त्यानं डिंपी गांगुलीशी लग्न केलं पण हेही लग्न फार काळ टिकलं नाही. डिंपीनं राहुलवर कौंटुंबीक हिंसाचाराचा आरोप केला होता. यानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१८ मध्ये त्यानं नतालियाशी लगीनगाठ बांधली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tI5KR0