Full Width(True/False)

बहुप्रतिक्षित Realme Narzo ३० स्मार्टफोन लाँच, मिळणार ४८MP कॅमेरा; किंमत फक्त...

नवी दिल्ली : रियलमीने आपला बहुप्रतिक्षित नार्जो ३० वरून पडदा हटवला आहे. ला मलेशियात लाँच करण्यात आल्या आहे. कंपनीने याआधी हँडसेटला सादर केला होता. नार्जो ३० चे वैशिष्ट्ये सांगायची तर यात ९० हर्ट्ज डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो G९५ प्रोसेसर, ४८ मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासारखे फीचर्स यात मिळतील. वाचाः Realme Narzo 30: किंमत ला कंपनीने ७९९ आरएम (जवळपास १४,२०० रुपये) मध्ये लाँच केले आहे. Realme Narzo 30: स्पेसिफिकेशन नार्जो ३० मध्ये ६.५ इंच फूल एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. स्क्रीनची पिक्सल डेनसिटी ४०५ पीपीई आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. स्मार्टफोनमध्ये डिस्प्लेवर फ्रंट कॅमेऱ्यासाठी एक लहान पंच-होल कटआउट देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G95 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो १२nm फॅब्रिकेशन प्रोसेसवर आधारित आहे. ग्राफिक्ससाठी यात माली-G76 GPU देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ६GB रॅम व १२८GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डद्वारे वाढवता येईल. फोन अँड्राइड 11 वर आधारित रियलमी UI 2.0 वर चालतो. वाचाः नार्जो ३० मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, जे रेक्टँग्युलर मॉड्यूलमध्ये आहे. रियरला एक एलईडी प्लॅश देखील आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सल प्रायमरी, २ मेगापिक्सल मॅक्रो आणि २ मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाइट सेंसर आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी अपर्चर एफ/२.१ सोबत १६ मेगापिक्सल सोनी IMX471 फ्रंट सेंसर देण्यात आले आहे. फोनमध्ये पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी ३० वॉट फार्स्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हँडसेटच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट, ३.५ एमएम हेडफोन जॅक, ड्यूल ४G VoLTE, वाय-फाय ८०२.११ ए/बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ ५.०, एनएफसी, जीपीएस/ए-जीपीएस आणि ग्लोनास सारखे फीचर्स यात मिळतील. रियलमी नार्जो ३० चे डायमेंशन १६२.३×७५.४×९.४ मिलीमीटर आणि वजन १९२ ग्रॅम आहे. फोन रेसिंग ब्लू आणि रेसिंग सिल्वर रंगाच्या व्हेरिएंट्समध्ये मलेशियात उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतात देखील लाँच होण्याची शक्यता आहे. वाचाः वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3whFuhI