Full Width(True/False)

Redmi Note 8 2021 मध्ये मिळणार वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, कंपनीने ट्विट केला फोनचा फोटो

नवी दिल्ली. रेडमी नोट ८ ग्लोबल सेलच्या २५ दशलक्ष युनिट्स मिळविल्याच्या आनंदात कंपनी हा फोन बाजारात आणणार आहे. रेडमी नोट ८ २१०२१ बद्दल वापरकर्त्यांमध्ये आधीपासूनच बरीच उत्सुकता होती आणि आता शुक्रवारी कंपनीने या आगामी स्मार्टफोनच्या फ्रंट लूकची झलक दाखवली असल्यामुळे युझर्सची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. जाणून घ्या रेडमी नोट ८ २१०२१ इतर डिटेल्सबद्दल विस्तृतपणे. वाचा : कंपनीने ट्विट करून दिली माहिती शाओमीने रेडमी नोट ८ २०२१ चा फ्रंट लूक आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलसह शेअर केला आहे. कंपनीने फोनचा फोटो शेअर करण्यासाठी #ThePerformanceAllStar हॅशटॅग वापरला आहे. कंपनीने या आगामी फोनमध्ये शेअर केलेला फोटो पाहून असे म्हणता येईल की फोनचा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिझाइनचा आहे. मे किंवा जूनमध्ये लाँच केला जाऊ शकतो फोन फ्रंट लुकनंतर, कंपनी लवकरच रेडमी नोट८ २०२१ चे मागील पॅनेल डिझाइनही देऊ शकते असे मानले जात आहे. जुन्या नोटच्या तुलनेत नवीन रेडमी नोट ८ मध्ये कंपनी काय ऑफर करत आहे हे येथे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे.मात्र, कंपनी हा फोन मे मध्ये फोन लाँच करणार की जूनमध्ये हे निश्चितपणे सांगता येणार नाही. ४००० एमएएच बॅटरी आणि एमआययूआय १२.५ काही अहवालात म्हटले आहे की रेडमी नोट८ चा मॉडेल क्रमांक एम१९०८ सी ३ जेजीजी आहे आणि त्याला ब्लूटूथ एसआयजी आणि एफसीसी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या दोन्ही सर्टिफिकेशननुसार फोनमध्ये ब्लूटूथ ५.२, एमआययूआय १२.५ आणि ४००० एमएएच बॅटरी अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. फोनमध्ये मिळू शकते मीडियाटेक हेलिओ जी ८५ चिपसेट या फोनमध्ये १२० एचझेडच्या रीफ्रेश रेटसह फुल एचडी + रेझोल्यूशन डिस्प्ले देणार आहे. फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी / १२८ जीबी अंतर्गत स्टोरेजसह येऊ शकतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी ८५ चिपसेट प्रदान करू शकते. फोन २२.५ वॅट्सच्या चार्जिंगसह फोन येऊ शकतो.फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅश असण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. यात ४८ मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा असू शकतो. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hKCzu1