Full Width(True/False)

भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन येतोय, किंमत फक्त 'इतकी' असणार

नवी दिल्ली : चीनी स्मार्टफोन कंपनी रियलमीने काही दिवसांपूर्वीच चे ४ जीबी रॅम आणि ४६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट लाँच केले होते. यासोबतच ८ हा भारतातील सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन बनला होता. मात्र, आता रियलमीच्या या फोनला सॅमसंगकडून जोरदार टक्कर मिळणार आहे. सॅमसंगकडून लवकरच हा स्वस्त स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. वाचा : लीक रिपोर्टनुसार, galaxy A22 हा सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन ठरू शकतो. आतापर्यंत हा Samsung चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. Samsung Galaxy A22 5G ला कमीत कमी १८० डॉलर (जवळपास १३ हजार रुपये) किंमतीत लाँच केले जाईल. या फोनला खासकरून भारत आणि आशियाई बाजारात लाँच केले जाण्याची शक्यता आहे. वाचा : Samsung Galaxy A22 चे संभाव्य स्पेसिफिकेशन एका रिपोर्टनुसार, Samsung Galaxy A22 ला ५जी सोबतच ४जी व्हर्जनमध्ये देखील सादर केले जाईल. स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरिएंटला वेगवेगळ्या स्पेसिफिकेशनसोबत सादर केले जाईल. फोनच्या ५जी मॉडेलमध्ये ६.४ इंचची एलसीडी स्क्रीन दिली जाऊ शकते. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सल असेल. तसेच, यात डेप्थ सेंसर आणि मॅक्रो लेंसचा सपोर्ट मिळेल. प्रोसेसरबद्दल सांगायचे तर फोनमध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम देण्यात येईल. फोनच्या ४ जी मॉडेलमध्ये एक रियर कॅमेरा मिळू शकतो. स्क्रीन ओलेडच्या जागी एलसीडी दिली जाऊ शकते. दोन्ही व्हेरिएंटमध्ये पॉवरसाठी ५०००mAh बॅटरी मिळेल. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ubqIYo