नवी दिल्लीः Redmi ने गेल्या आठवड्यात भारतात Redmi Note 10S स्मार्टफोन सोबत आपली पहिली स्मार्टवॉच Redmi Watchला लाँच केले होते. या स्मार्टवॉचचा आज पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. ४ हजार रुपयांपेक्षा कमी किंमत येणाऱ्या या स्मार्टवॉचमध्ये १० दिवसांची बॅटरी लाइफ, जीपीएस कनेक्टिविटी आणि अन्य दुसरे फीचर्स दिले आहेत. या स्मार्टवॉचची थेट टक्कर Boat Explorer आणि नुकतीच लाँच झालेली NoiseFit Active या स्मार्टवॉच सोबत होणार आहे. वाचाः स्मार्टवॉचची किंमत आणि सेल रेडमी स्मार्टवॉचचा पहिला सेल आज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. याला ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart, Mi Home आणि Mi Studios वरून खरेदी करू शकता. या स्मार्टवॉचची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. या सेगमेंट मध्ये सर्वात स्वस्त स्मार्टवॉच आहे. या स्मार्टवॉच मध्ये स्ट्रॅप कलर ऑप्शन ब्लू, ब्लॅक, आयवरी, ओलीव उपलब्ध आहेत. वाचाः रेडमी वॉचमध्ये जीपीएस कनेक्टिविटीसोबत येणाऱ्या या स्मार्टवॉच मध्ये १.४ इंचाचा TFT LCD डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले 320×320 पिक्सल रिज़ॉल्यूशन आहे. ज्यावर 2.5D कर्व्ड ग्लास दिला आहे. ज्यात २०० हून अधिक वॉच फेस आणि ११ स्पोर्ट्स मोड मिळतात. ज्यात आउटडोर सायकिलिंग, इनडोर सायकिलिंग, रनिंग ट्रेडमिल, वॉकिंग आणि स्विमिंगचा समावेश आहे. यात एक डेडिकेटेड मल्टि फंक्शन बटन दिले आहे. यावरून नोटिफिकेश पाहू शकता. वाचाः हेल्थ आणि फिटनेसला डोळ्यासमोर ठेवून यात 24/7 हार्ट रेट डिटेक्शन, स्लीप ट्रॅकिंग, ब्रीदिंग, एयर प्रेशर डिटेक्शन, स्टेप काउंटरसह अनेक फीचर्स दिले आहेत. यात 230 mAhची बॅटरी दिली आहे. रेडमी वॉच एकदा चार्ज झाल्यानंतर १० दिवसांची बॅटरी लाइफ सोबत येते. कंपनीचा दावा आहे की, या स्मार्टवॉचला चार्ज होण्यासाठी दोन तास लागतात. हे 5 ATM वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंट आहे. या स्मार्टवॉच मध्ये म्यूझिक कंट्रोल, अलार्म, वेदर, कॉल नोटिफिकेशन, स्टेप काउंटर आणि फाइंड माय फोन सारखी सुविधा यात मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3veVXn3