Full Width(True/False)

Whats App युजर्ससाठी दुप्पट आनंद, नवीन सेफ्टी फीचर आले, 'हा' फायदा होणार

नवी दिल्ली. इन्स्टंट मेसेजिंग App प्लॅटफॉर्म Whats App युझर्सना ६ अंकी पडताळणी कोड मिळतो आणि तो कोड व्हॉट्सअ‍ॅप कंपनीचा आहे असा दावा केला जातो. त्यानंतर युझर्सना ओटीपी शेयर करण्यास सांगितले जाते. युझर्सने कोड शेयर करताच अकाउंट हॅक केले जाते. अशा घोटाळ्यांपासून बचाव करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप एका नव्या फिचरवर काम करत आहे. WABetaच्या एका वृत्तानुसार, व्हॉट्सअपने नुकतेच फ्लॅश कॉल नावाच्या नवीन फीचरवर काम सुरु केले आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर लॉग-इन करण्याचा प्रयत्न केल्यावर युझर्सना त्यांचा फोन नंबर स्वयंचलितपणे पडताळता येईल.हे फीचर तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल. काय आहे हे नवीन फीचर, यांच्य मदतीने तुम्हाला अकाउंट घोटाळ्यांपासून कसे सुरक्षित ठवता येईल जाणून घ्या डिटेलस. वाचा : युझर्सची मंजुरी असेल आवश्यक फ्लॅश कॉल, WhatsApp चे नवीन वैशिष्ट्य आहे. फोनच्या कॉल लॉगमध्ये प्रवेश करण्यासाठी युझर्सची मंजूरी आवश्यक आहे. असे केल्या नंतर व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर प्रवेश देण्यासाठी कॉल घेतला तर ते आपोआप सत्यापित होईल. हे वैशिष्ट्य Appच्या अँड्रॉइड बीटा आवृत्ती २.२१.११.७ वर पाहिले आहे. अहवालात दिलेल्या स्क्रीनशॉटनुसार, फ्लॅश कॉल एक पर्यायी वैशिष्ट्य असेल, जे युझर्स त्यांच्या आवडीनुसार वापरू शकतील. यात, युझर्सना फ्लॅश कॉलसाठी त्यांच्या कॉल लॉगवर व्हॉट्सअॅपला ऍक्सेस द्यायचा आहे की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल. फ्लॅश कॉल एक उपयुक्त फीचर एकुणच, फ्लॅश कॉल एक चांगले फीचरआहे. WhatsApp ने स्वतःच अशा फसवणूकीविषयी वापरकर्त्यांना सतर्क केले आहे ,ज्यात सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांना कंपनीचे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात आणि त्यांना मेसेज पाठवतात आणि त्यांना पुन्हा ओटीपी शेयर करण्यास सांगतात. अशा कॉल फसवणूकीमुळे युझर्स त्यांना म्हणतात की, त्यांना त्यांचे खाते सत्यापित करण्याची आवश्यकता आहे आणि ते तसे न केल्यास ते बंद केले जाईल. या भीतीमुळे, युझर्स त्यांचे ओटीपी शेयर करतात आणि त्यांच्या अकाउंटचा ऍक्सेस गमावतात. हे फीचर युझर्सना त्यांचे अकांऊट अधिक सुरक्षित ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावेल यात दुमत नाही. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SgL1GO