नवी दिल्लीः सध्या अनेक स्मार्टफोनमध्ये दोन सीम कार्ड असतात. परंतु, त्यात फक्त एकाच नंबरवरून व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप मध्ये अशी अजून तरी सुविधा देण्यात आली नाही. परंतु, या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगणार आहोत. याचा वापर केल्यास तुम्ही एकाच फोनमध्ये दोन वेगवेगळे अकाउंट्सचा वापर करू शकाल. वाचाः एकाच फोनवर दोन व्हॉट्सअॅप अकाउंट चालवण्याचे फायदे आहे. याप्रमाणे तुम्ही आपले पर्सनल आणि प्रोफेशन लाइफला वेगवेगळे ठेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला ज्या ट्रिक बद्दल सांगणार आहोत. त्यात तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करावे लागणार नाही. फक्त तुम्हाला फोनमधील एका खास फीचरचा वापर करावा लागणार आहे. वाचाः हे फीचर काम करेल आम्ही ज्या फीचरची बात करीत आहोत. त्याचे नाव Dual Apps किंवा App Clone आहे. हे वेगवेगळ्या कंपनीच्या फोनमध्ये वेगवेगळ्या नावाने येत असतात. या फीचरचे काम कोणत्याही अॅपचे किंवा क्लोनचे डुप्लिकेट तयार करणे आहे. डुप्लिकेट अॅपवर आपल्या नवीन अकाउंटचा वापर करू शकता. जाणून घ्या फोनमधील या फीचरला कोणत्या नावाने ओळखले जाते. वाचाः Samsung स्मार्टफोन - Dual Messenger Xiaomi स्मार्टफोन - Dual Apps Oppo स्मार्टफोन - Clone Apps Vivo स्मार्टफोन - App Clone Huawei स्मार्टफोन - App Twin Honor स्मार्टफोन - App Twin Asus स्मार्टफोन - Twin Apps वाचाः असे चालवा फोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप स्टेप पहिलीः यासाठी सर्वात आधी तुम्हाला फोनच्या Dual App किंवा App Clone फीचरमध्ये जावे लागेल. या ठिकाणी खूप साऱ्या अॅप्सची लिस्ट दिसेल. स्टेप दुसरीः या लिस्ट मध्ये Whastapp ला सिलेक्ट करून त्याचा क्लोन तयार करावे लागेल. त्यानंतर त्याला इंस्टॉल करावे लागेल. स्टेप तिसरीः दुसरे व्हॉट्सअॅप इंस्टॉल झाल्यानंतर त्यावर क्लिक करा. स्टेप चौथीः यात आपल्या दुसऱ्या नंबरवरून अकाउंट तयार करा. जर आधीचे अकाउंट असेल तर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. स्टेप पाचवीः या प्रमाणे फोनमध्ये दोन्ही नंबरवरून अकाउंट सुरू राहतील. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oav80D