Full Width(True/False)

अभिनवने फिरवला श्वेता तिवारीचा डाव, शेअर केले नवे CCTV फुटेज

मुंबई : अभिनेत्री आणि तिचा नवरा यांच्यातील वाद दिवसागणिक अधिकाधिक चिघळत चालला आहे. हे दोघे एकमेकांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने आरोप-प्रत्यारोप, एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. 'खतरों के खिलाडी ११' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी श्वेता तिवारी दक्षिण आफ्रिकेला गेल्यानंतर या दोघांमधील वादाला पुन्हा सुरुवात झाली. श्वेता दक्षिण आफ्रिकेला जाताना मुलाला एकट्याला सोडून गेल्याचा आरोप अभिनवने केला होता. मुलाला मी खूप शोधले पण त्याचा पत्ता लागलेला नाही,असेही त्याने सांगितले. त्यावर श्वेताने अभिनव हा अत्यंत बेजबाबदार वडील असल्याचा आरोप केला होता. तसेच मुलासाठी एकही पैसा खर्च करत नसल्याचेही सांगितले. यासोबत श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोसायटीचे सीसीटिव्ही फुटेजचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अभिनव रेयांशला श्वेतापासून हिसकावून घेताना दिसत आहे. अर्थात या व्हिडीओमध्ये कोणाचाही चेहरा स्पष्ट दिसत नाही. श्वेताने केलेले सर्व आरोप फेटाळून लावणारा व्हिडीओ अभिनवने सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमधून मुलांच्या संगोपनासाठी कार्यक्रमाच्या मानधनातील काही रक्कम श्वेताच्या अकाउंटला ट्रान्स्फर केल्याचा दावा अभिनवने केला होता. श्वेताने व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेक युझर्सनी आणि काही सेलिब्रिटीजनी अभिनव कोहलीवर कडाडून टीका केली आहे. त्यासोबत त्यांनी श्वेताला पाठिंबा दिला. यानंतर अभिनवने त्याच्या इन्स्टाग्रामवर मुलगा रेयांशसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रेयांश अभिनवशी खेळताना दिसत आहे. खेळताना रेयांश म्हणतो की, त्याला पप्पाकडे जायचे आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये अभिनव रेयांशला विचारतो की जेव्हा पोलीस घरी आले होते तेव्हा तू मम्माला काय सांगत होतास? त्यावर रेयांश म्हणतो,'मी असं म्हणत होतो की मला मम्माकडे जायचे नाही.' अभिनवने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ एक तासाहून अधिक कालावधीचा आहे. या व्हिडीओमध्ये श्वेताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ देखील आहे. त्यामध्ये अभिनव रेयांशला श्वेताकडून हिसकावून घेताना दिसत आहे. त्यांच्या या झटापटीमध्ये श्वेता खाली पडते. त्यावर अभिनव म्हणतो की श्वेता ही स्वतःहून खाली बसली होती. जर मी मुलाला हिसकावून घेऊन जात होतो तर ती आरामात चालत कशी आली? हा धक्का श्वेतासाठी नव्हता तर माझ्यासाठी होता, असेही अभिनवने सांगितले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RN1ke4