Full Width(True/False)

भन्नाट ट्रिक! WhatsApp चे ‘हे’ फीचर वापरून कोणालाही करू शकता ट्रॅक

नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या भारतात मोठी आहे. आज स्मार्टफोन वापरणारा प्रत्येकजण या अ‍ॅपचा वापर करतोच. बहुतांश वेळ या अ‍ॅपवर घालवून देखील अनेकांना यातील काही फीचर्सबद्दल माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फीचरबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणताही नवीन पत्ता सहज शोधू शकता. या फीचरद्वारे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना देखील स्वतःचे पाठवू शकता. या फीचरचा उपयोग सुरक्षेसाठी देखील करता येईल. हे फीचर कसे वापरू शकता, ते जाणून घेऊया. वाचाः असे शेअर करा तुमचे लोकेशन
  1. सर्वात प्रथम तुमचे व्हॉट्सअ‍ॅप उघडा.
  2. आता चॅट पर्यायावर जा.
  3. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला आपले लोकेशन पाठवयाचे आहे, त्याचे नाव सिलेक्ट करा.
  4. व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये खाली + किंवा क्लिप आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  5. येथे तुम्हाला लोकेशन निवडण्याचा पर्याय दिसेल.
  6. येथे तुम्हाला Send Your Current Location आणि असे दोन पर्याय दिसतील.
  7. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यातील पर्याय निवडून सेंड करू शकता.
वाचाः लोकेशन शेअर करताना या गोष्टी ठेवा लक्षात जर तुम्ही एखाद्याला तुमचे Current location पाठवले तर हे तुम्ही ज्या ठिकाणी आहात, तेथील लोकेशन असेल. जर तुम्ही Live location पाठवल्यास तुमच्या हालचालींसोबत, तुम्ही जसा प्रवास करेल तसे हे लोकेशन बदलत राहील. लाइव्ह लोकेशनवर क्लिक केल्यानंतर हे लोकेशन तुम्हाला १५ मिनिटे, १ तास की ८ तासांसाठी पाठवायचे आहे, याचा पर्याय देखील मिळेल. थोडक्यात, एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला लाइव्ह लोकेशन पाठवले तर तुम्ही त्या व्यक्तीला ट्रॅक करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यातील पर्याय निवडू शकता. जर तुम्हाला लाइव्ह लोकेशन शेअरिंग बंद करायचे असेल तर लाइव्ह लोकेशन शेअरवर जाऊन स्टॉप बटन दाबावे लागेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3odK1iL