Full Width(True/False)

'3 Idiots च्या सीनवेळी तीघंही सेटवर दारू पिऊन आलो होतो'

मुंबई- बॉलिवूड अभिनेता याच्या गाजलेल्या चित्रपटांमधील एक असलेल्या '' चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली होती. आजही या चित्रपटातील संवाद प्रेक्षकांच्या तोंडावर आहेत. चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे चित्रपटाने समीक्षकांची वाहवा मिळवली होती. या चित्रपटाचा एक भाग असलेल्या अभिनेता शर्मन जोशी याने चित्रपटातील एका सीनबद्दल खुलासा केला आहे. राजू रस्तोगी हे पात्र साकारणाऱ्या शर्मनने याच्या वाढदिवसानिमित्त खुलासा करत म्हटलं की एका सीनसाठी तिघांनीही सेटवर चक्क दारू प्यायली होती. '३ इडियट्स' चित्रपटात एक सीन आहे ज्यात राजू, रॅन्चो आणि फरहान दारू पिऊन व्हायरसला शिव्या देतात. या सीनला आणखी प्रभावी बनवण्यासाठी आमिर, माधवन आणि शर्मन यांनी सेटवरच दारू प्यायल्याची कबुली स्वतः शर्मनने एका मुलाखतीत दिली. शर्मन म्हणाला, 'मला आठवतंय आम्हाला दारू पिऊन बोमन इराणी याच्या पात्राला शिव्या द्यायच्या होत्या. त्यावेळेस आमिरने सुचवलं की, आपल्याला हा सीन खरोखर दारू पिऊन केला पाहिजे. आमिर आणि मी दारू प्यायला सुरुवात करणार होतो पण माधवनला यायला थोडासा उशीर झाला. आमिरने माधवनला सांगितलं आमच्यासोबत दारू प्यायला बस. माधवन जास्त दारू पीत नाही, पण आमच्यासोबत बसल्यानंतर तो जरा जास्तच प्यायला.' माधवनचं कौतुक करत शर्मन म्हणाला, 'जोपर्यंत चित्रीकरण सुरू झालं आम्ही जरा जास्तच प्यायलो होतो. पण माधवनने आमच्या दोघांपेक्षा जास्त चांगला अभिनय केला. माधवनचं हे रूप खूप कमी पाहायला मिळतं. तो खूप कमी दारू पितो. त्यामुळे त्याचा तो अवतार आमच्या लक्षात राहिला.' काही दिवसांपूर्वी माधवनला करोनाची लागण झाली होती. त्यावेळेसही माधवनने '३ इडियट्स' चित्रपटाचा संदर्भ देत चाहत्यांना याबद्दची माहिती दिली होती. अभिनेत्यांच्या कामाबद्दल सांगायचं तर आमिर लवकरच 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात झळकणार आहे. तर माधवन लवकरच 'रॉकेट्री' चित्रपटात झळकणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2SRpYe1