Full Width(True/False)

निशाचे जखमी फोटो आले समोर, करणनं याआधीही केली मारहाण

मुंबई: 'ये रिश्‍ता क्‍या कहलाता है' फेम अभिनेता सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. करणची पत्नी निशा रावलं त्याच्यावर कौटुंबीक हिंसाचार आणि मारहाणीचा आरोप केला आहे. निशाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी करणला अटकही केली होती पण जमिनावर त्याची सुटका सुद्धा करण्यात आली. त्यानंतर एका प्रेस कॉन्फरन्समध्ये निशा रावलनं तिची बाजू मांडली आणि त्याचवेळी तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. ज्यात ती जखमी अवस्थेत दिसत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना निशानं तिच्या आणि करणच्या नात्याबद्दल काही धक्कादायक खुलासेही केले आहेत. काही महिन्यांपूर्वीच तिला करणचं दुसऱ्या मुलीशी अफेअर असल्याचं समजलं होतं. ज्यामुळे तिनं घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. एवढंच नाही तर निशाचं म्हणणं आहे की, करणनं तिला अनेकदा मारहाण केली आहे. पण आपल्या मुलासाठी ती आतापर्यंत गप्प राहिली होती. याशिवाय करणनं निशाचे दागिनेही विकल्याचा आरोप निशानं केला आहे. दरम्यान त्याआधी करणनं त्याची बाजू मांडताना निशा बायपोलर आणि आक्रमक आहे तसेच ती शिवीगाळ करते असा दावा केला होता. तो म्हणाला, 'निशाच्या म्हणण्याप्रमाणे मी कायदेशीर मार्गचा वापर करण्यासाठी तयार होतो. मी माझ्या आई-बाबांशी बोलण्यासाठी माझ्या खोलीत गेलो. तेव्हा निशा देखील तिथे आली आणि तिनं माझ्यासह माझे आई-वडील आणि भाऊ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती जोरजोरात ओरडत होती. ती माझ्यावर थुंकली. मी जेव्हा तिला बाहेर जाण्यास सांगितलं तेव्हा ती मला धमकी देऊ लागली. मी इथून निघून गेले तर काय करते ते पाहाच अशी धमकी तिनं मला दिली होती. त्यानंतर तिनं स्वतःचं डोकं भिंतीवर आपटायला सुरुवात केली आणि नंतर हे सर्व मी केल्याचं सर्वांना सांगितलं.' करण आणि निशामधील हे भांडण सध्या सोशल मीडियावर चर्चेत असतानाच निशाच्या मैत्रिणी आणि मुनीशा खटवानी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री कश्मीरा शाहच्या म्हणण्यानुसार करणनं निशाला याआधीही मारहाण केली होती. कश्मीरा म्हणाली, 'मी निशाच्यासोबत आहे. करण अनेक आर्थिक समस्यांमध्ये अडकलेला आहे. त्यानं याआधीही निशाला मारहाण केली होती. जेव्हा आम्ही तिच्या घरी गेलो होतो त्यावेळी आम्ही हे पाहिलं आहे. निशा नेहमीच याबाबत शांत राहिली कारण ही खूपच खासगी बाब होती. त्या दोघांमध्ये भांडणं होती हे माहीत होतं पण हे सर्व इथपर्यंत पोहोचेल याची कल्पना नव्हती. आम्ही तिच्या वैयक्तीत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही फक्त मैत्रिणीच्या नात्यानं तिला पाठिंबा देऊ शकतो.' कश्मीराशिवाय टॅरो कार्ड रिडर आणि निशाची मैत्रीण मुनीशा खटवानी हिनंही निशाला पाठिंबा दिला आहे. ती म्हणाली, 'मी, रोहित वर्मा आणि कश्मीरा शाह सकाळपर्यंत निशाच्या सोबत होतो. तिच्या मैत्रिणी आणि कुटुंबीय असल्याच्या नात्यानं आता हे सर्व सहन करणं आम्हाला कठीण जात आहे. निशा सध्या दुःखी आहे पण लवकरच ती प्रसार माध्यामांसमोर येऊन सर्व गोष्टींचा सविस्तर खुलासा करेल.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vLwrps