नवी दिल्लीः ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India चा शानदार Mobile Saving Days सेलचा आज १२ जून रोजी शेवटचा दिवस आहे. या मोबाइलचा सेल ९ जून पासून सुरू झाला होता. या सेलमध्ये स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय दिला जात आहे. याशिवाय, डिव्हाइसवर बँकांकडून डिस्काउंट दिला जात आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी आयक्यू, ओप्पो आणि रियलमीच्या काही निवडक स्मार्टफोन्सवर देण्यात येत असलेल्या डिस्काउंट संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या. वाचाः ओप्पोचा हा ४ जीबी रॅम व्हेरियंट १० हजरा ४९० रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोनला ९ हजार ९५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर वर खरेदी करता येऊ शकतो. यासोबत फोनवर एचडीएफसी बँकेकडून ७५० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4230mAh ची बॅटरी दिली आहे. Mediatek P35 प्रोसेसर दिला आहे. याशिवाय, या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः ICICI बँकेकडून क्रेडिट कार्ड होल्डर्सला iQOO 7 Legend 5G खरेदी केल्यानंतर ३ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. तसेच या फोनवर एक्सचेंज आणि नो कॉस्ट ईएमआय सुद्धा दिला जात आहे. iQOO 7 Legend 5G मध्ये जबरदस्त परफॉर्मन्ससाठी Snapdragon 888 प्रोसेसर आणि ६.६२ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ६६ वॉट फ्लॅश चार्ज सपोर्टची बॅटरी दिली आहे. वाचाः Realme X7 रियलमीचा ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनला ग्राहक एक्सचेंज आणि नो कॉस्ट ईएमआय सारख्या ऑफर्स सोबत खरेदी करू शकता. ग्राहकांना HDFC कार्डवरून पेमेंट केल्यानंतर १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. या फोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 800U प्रोसेसर दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी 4,300mAh ची बॅटरी दिली आहे. ६५ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35b1KyD