नवी दिल्ली : भारतात लाखो लोकं महिन्याचे किंवा वर्षाचे सबस्क्रिप्शन घेऊन Disney+Hotstar VIP, , , , ZEE5 सह अनेक ओटीटी व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्याचा आनंद घेतात. MX Player इतर अ‍ॅप्सच्या तुलनेत मोफत सुविधा देते. वाचाः डिज्नी+ हॉटस्टार भारतात लोकप्रिय आहे. यावर दररोज नवनवीन चित्रपट आणि सीरिज लाँच होत असतात. मात्र, अनेक लोक पैशांमुळे महागडे सबस्क्रिप्शन घेणे टाळतात. मात्र, सोप्या ट्रिक्सद्वारे तुम्ही Disney+Hotstar वरी कॉन्टेंट मोफत पाहू शकता. ही ट्रिक काय आहे जाणून घेऊया. Disney + Hotstar वरील नवीन सीरिज आणि चित्रपट मोफत पाहण्यासाठी तुम्हाला टेलिग्रॅम अ‍ॅपची मदत घेऊ शकता. या अ‍ॅपमध्ये व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच अनेक दमदार फीचर्स मिळतात. मात्र, त्या व्यतिरिक्त या प्लॅटफॉर्म्सवर हजारो ग्रुप्स आहेत व या ग्रुप्सवर यूजर्स लेटेस्ट व्हिडीओ-फोटो, चित्रपट आणि वेब सीरिज टाकत असतात. यात डिज्नी+ हॉटस्टार, , सोनी लिव्ह, प्राइम व्हिडीओसह अनेक ओटीटी अ‍ॅप्सवरील सीरिज-चित्रपट मोफत पाहता येतील. वाचाः जर तुम्हाला Disney+Hotstar प्लॅटफॉर्मवरील नवीन चित्रपट अथवा सीरिज पाहायची असल्यास टेलिग्रॅम अ‍ॅपच्या सर्च बॉक्समध्ये संबंधित चित्रपट किंवा सीरिजचे नाव टाका. यानंतर सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला अनेक ग्रुप्स दिसतील, ज्यात डाउनलोडिंग आणि ऑनलाइन वॉचचा पर्याय मिळेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार चित्रपट/सीरिज डाउनलोड करू शकता अथवा ऑनलाइन पाहू शकता. दरम्यान, या आर्टिकलमधून आम्ही कोणत्याही पायरसीला सपोर्ट करत नाही. केवळ जे लोक महागडे सबस्क्रिप्शन घेऊ शकत नाही, त्यांना एक पर्याय सांगत आहोत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zlo9XA