Full Width(True/False)

'माझ्यासाठी तुम्ही आजही जिवंत आहात', फरहान अख्तर भावुक

मुंबई : भारताचे ज्येष्ठ अॅथलिट यांचे १८ जून रोजी रात्री निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. मिल्खा सिंग यांच्यावर काही दिवसांपासून चंडीगढ येथील पीजीआय इस्पितळात उपचार सुरू होते. मिल्खा यांना केवळ क्रीडा विश्वातीलच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ही श्रद्धांजली वाहिली आहे. मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारलेल्या '' सिनेमात काम केलेल्या याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. मिल्खा सिंग यांना करोनाची लागण झाल्यापासून त्यांच्यावर एका महिन्यापासून उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री ११.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याआधी चार दिवसांपूर्वी रविवारी, त्यांची पत्नी निर्मल कौर यांचेदेखील करोनामुळेच निधन झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगा जीव मिल्खा सिंग आणि तीन मुली आहेत. फरहानने त्याच्या सोशल मीडियावर मिल्खा सिंग यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, 'प्रिय मिल्खा जी, तुम्ही गेलात या गोष्टीवर माझे मन अजूनही मानायला तयार नाही. एखादी गोष्ट हाती घेतली की तडीस न्यायची सवय मी तुमच्याकडूनच शिकलो. ही गोष्ट मी पुरती भिनवून घेतली आहे, त्यामुळे तुम्ही कायमच माझ्यासाठी जिवंत असाल. कारण तुम्ही सहृदय व्यक्ती होतात. तुम्ही अनेकांवर प्रेम केले आणि इतकी प्रसिद्धी मिळूनही तुम्ही कायमच जमिनीवर होता.' त्याने पुढे लिहिले की, 'तुम्ही एका विचार मांडला, एका स्वप्नाचे प्रतिनिधीत्व केले होते. तुमच्याच शब्दांत सांगायचे तर, 'मेहनत, खरेपणा आणि दृढ निश्चयाच्या जोरावर एखादी व्यक्ती गगनाला गवसणी घालू शकते.' तुमच्या या विचारांनी आमच्या सगळ्यांचे आयुष्य व्यापले आहे. ज्या व्यक्ती तुम्हाला एका वडिलांप्रमाणे, मित्राप्रमाणे मानत होते त्यांच्यासाठी तुम्ही आशीर्वाद होता. जे तुम्हाला व्यक्तिगतरित्या ओळखत नव्हते त्यांच्यासाठी तुम्ही प्रेरणादायी व्यक्तीमत्व होता. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो.' फरहानच्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक फरहान अख्तरने २०१३ मध्ये मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आलेल्या ' भाग मिल्खा भाग' या सिनेमात त्यांची व्यक्तिरेखा साकारली होती. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला सिनेमा लोकांना खूप आवडला होता. फरहानच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी हा एक सिनेमा होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iSYWOs