Full Width(True/False)

चीनी कंपनीने या स्मार्टफोनमुळे भारतातून एका आठवड्यात कमावले २०० कोटी रुपये

नवी दिल्लीः चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने एका आठवड्यात स्मार्टफोन विकून २०० कोटी रुपयाची कमाई केली आहे. हा दावा कंपनीने स्वतः केला आहे. शाओमीच्या माहितीनुसार, हा डेटा शाओमी डेटा सेंटरमधील आहे. शाओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन यांनी एक ट्विट करून हा दावा केला आहे. या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले की, Mi 11 Lite स्मार्टफोनला लाँच करण्यात आले होते. वाचाः Mi 11 Lite स्मार्टफोनचा नुकताच सेल पार पडला. या महिन्याच्या सुरुवातीला Mi 11X चा सेल पार पडला होता. याची जबरदस्त विक्री झाली. फक्त ४५ दिवसांत ३०० कोटींची कमाई केली आहे. तसेच शाओमीने म्हटले होते की, Redmi Note 10 सीरीजला कंपनीने भारातत ३००० कोटीची कमाई करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला शाओमीने म्हटले की, रेडमी नोट १० सीरीज लाँच केल्यानंतर २० लाख युनिट्सची विक्री केली होती. Redmi Note 10 सीरीजला कंपनीने या वर्षीच्या मार्च महिन्यात लाँच केले होते. Mi 11 सीरीज को Redmi Note 10 सीरीज नंतर लाँच करण्यात आले होते. Mi 11 सीरीज अंतर्गत Mi 11, Mi 11 Ultra आणि Mi 11 Lite सारख्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. वाचाः भारतात चीनी स्मार्टफोन्स कंपनीचा दबदबा आहे. शाओमी यात नंबर वन वर आहे. मार्केट शेयर मध्ये सुद्धा या कंपनीचे सर्वात जास्त आहे. दुसऱ्या नंबरवर दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आहे. टॉप ५ कंपनीमध्ये ४ कंपन्या या चीनच्या आहेत. यात विवो आणि ओप्पोचा समावेश आहे. शाओमीच्या स्मार्टफोन्सला भारतात खूप प्रसिद्ध आहेत. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3y58WIU