नवी दिल्ली : आज वर्ल्ड डे २०२१ आहे. , सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर प्रचंड वाढला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे कोट्यावधी लोक ओळखी-अनोळखी लोकांशी जोडलेले आहे. दररोज काहीना काही शेअर करत असतात. मात्र, अनेकदा आपण अशी माहिती शेअर करतो, ज्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्ही देखील या प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल तर विना विचार करता काहीही शेअर करू नका. वर्ल्ड सोशल मीडिया डे च्या निमित्ताने अशाच गोष्टी जाणून घेऊया, ज्या या प्लॅटफॉर्म्सवर शेअर करणे टाळावे. वाचाः हिंसक पोस्ट फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंसा पसरवणाऱ्या पोस्ट शेअर करू नये. हिंसा पसरण्याच्या उद्देशाने पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर्सला प्लॅटफॉर्मकडून ब्लॉक केले जाते. सोबतच, कंपन्या आयपी एड्रेस पोलिसांना पाठवतात व अशा यूजर्सवर कारवाई होऊ शकते. प्रतिबंधित सामान फेसबुक अथवा ट्विटरवर गैर-वैद्यकीय औषधांपासून मादक पदार्थांच्या खरेदी-विक्रीवर बंदी आहे. सोबतच दारू-गोळा, बंदुकींची खरेदी-विक्रीवर देखील बंदी आहे. यूजर्सने अशा पोस्ट शेअर केल्यास अकाउंट ब्लॉक होते व कारवाई देखील केली जाते. वाचाः दहशतवाद दहशतावादी संघटना हिंसक गोष्टी, हत्या, मानवी तस्करी, संघटित हिस्सा अशा गोष्टीत सहभागी असतात. फेसबुक अशा संघटनांना अथवा लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट त्वरित हटवत असते. राजकीय, धार्मिक अथवा आंतरराष्ट्रीय संघटनेला घाबरवणे किंवा हिंसक गोष्टीत सहभागी असल्याचे आढळल्यास अशा यूजर्सवर बंदी घातली जाते व अकाउंट डिलीट केले जाते. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही पोस्ट शेअर करू नयेत. लोकेशन फेसबुक, ट्विटर, सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यूजर्स आपले करंट लोकेशन शेअर करत असतात. मात्र, असे केल्याने मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही बाहेर फिरायला गेला आहात व तेथील लोकेशन टाकून पोस्ट शेअर केल्यास तुमच्या घरी कोणी नाही, अशी माहिती पसरते. यामुळे घरी चोरी करणे खूपच सोपे होते. त्यामुळे तुमचे करंट लोकेशन शेअर करणे टाळावे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jr0jnZ