मुंबई: बॉलिवूडच्या प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर यांचं सोमवर ७ जून रोजी मुंबईमध्ये निधन झालं. '' सारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलेल्या सहर यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. त्यांना काही दिवसांपूर्वीच लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण उपचारा दरम्यान कार्डिएक अरेस्टने त्यांचं निधन झालं. सहर यांच्या निधनानंतर बॉलिवूडच्या कलाकारांसह दिग्दर्शकांनीही दुःख व्यक्त केलं आहे. सहर अली लतीफ यांच्या निधनावर राजकुमार राव, हुमा कुरैशी, अनुराग कश्यप, शिबानी दांडेकर, रोहित सराफ, मिलाली पालकर, निमरत कौर, हर्षवर्धन कपूर, सान्या मल्होत्रा, नोरा फतेही, मसाबा गुप्ता, मानवी गागरू आणि मुकेश छाब्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सहर यांनी आपल्या बॉलिवूड कारकिर्दित में 'द बेस्ट एग्जॉटिक मॅरीगोल्ड होटल', 'मिलियन डॉलर आर्म', 'शकुंतला देवी', 'दुर्गामती: द मिथ', 'मॉन्सून शूटआउट' आणि 'द लंचबॉक्स' यांसारख्या चित्रपटासाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम पाहिलं होतं. याशिवाय काही वेब सीरिजसाठीही त्यांनी कास्टिंग डायरेक्शन केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34X9Kmz