मुंबई: ज्येष्ठ अभिनेते यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आज सकाळी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. तब्येतीच्या अनुशंगाने दिलीप कुमार यांच्या विविध वैद्यकीय चाचण्याही करण्यात येत आहेत. या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार दिले जातील, असे रुग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या महिन्यात देखील दिलीप कुमार यांना आरोग्य संबंधित काही तक्रारी उदभवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यांची पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली होती. दिलीप कुमार ९८ वर्षांचे असून सायरा कायम त्यांची काळजी घेत असतात. दिलीप कुमार यांच्या आरोग्याची प्रत्येक महिन्याला तपासणी केली जाते. दिलीप कुमार यांनी करोनाकाळात ट्विट करून सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी ट्विट करत म्हटलं, 'मी सगळ्यांसाठी प्रार्थना करतोय आणि अशी आशा करतोय की सगळे या संकटावर लवकरात लवकर मात करू.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fTfe8g