Full Width(True/False)

टायगर विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आएशा श्रॉफ भडकल्या

मुंबई : बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टागर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेंड काल एकत्र फिरताना आढळून आले होते. त्या दोघांचे वांद्रे परिसरात लाँग ड्राइव्हला जातानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु त्यानंतर टायगरच्या अडचणी वाढत गेल्या. करोना प्रतिबंधक नियमांचा भंग केल्याप्रकरणी टायगरविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही बातमी आल्यानंतर टायगरची आई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून नेमके काय घडले याची माहिती सोशल मीडियावर दिली. आएशा म्हणाल्या... मीडिया फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टायगर आणि दिशाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. या व्हिडीओमध्ये पोलिसांनी या दोघांना थांबवून त्यांची चौकशी करत असल्याचे दिसत आहे. विरल भयानीच्या या पोस्टवर आएशा चांगल्याच भडकल्या असून त्यांनी यावर सडेतोड उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, 'तुम्ही दिलेली माहिती चुकीची आहे. हे दोघेजण घरी येत होते आणि पोलिसांनी त्यांचे फक्त आधार कार्ड तपासले. सध्या कुणीही बाहेर फिरण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. त्यामुळे कृपा करून काहीही सांगण्याच्या आधी सत्यता पडताळून बघा. धन्यवाद.' युझरने केले ट्रोल परंतु ही गोष्ट इतक्यावरच थांबली नाही तर एका युझरने थेट टायगरवर टीका केली. या टीकाकारालाही आएशा यांनी सडेतोड उत्तर दिले. त्या म्हणाल्या, जेव्हा टायगरने गरजू लोकांना जेवायला दिले तेव्हा त्यावर कुणीही चर्चा केली नाही. कारण मुळातच टायगरला या गोष्टींचा गाजावाजा करायला आवडत नाही. दरम्यान यानंतर ही पोस्ट विरलने डिलीट करून टाकली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cdk26f