Full Width(True/False)

जून महिन्याच्या पहिल्याच तारखेला BSNL कडून गूड न्यूज, या युजर्संना मिळणार आता जास्त वैधता

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना खूष करण्यासाठी या महिन्याच्या पहिल्याच तारखेला म्हणजेच १ जून रोजी एक गुड न्यूज दिली आहे. कंपनीने आपल्या युजर्संना २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्रीपेड डेटा प्लानची वैधता वाढवली आहे. १९८ रुपयांच्या प्लान सोबत आता ५० दिवसांची वैधता मिळेल. यासोबतच लोकधुन कंटेंटचे अॅक्सेस फ्री मिळणार आहे. वाचाः आता या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा आणि ४५ दिवसांची बीएसएनएल ट्यून्स ऑफर केली होती. आता तुम्ही १९८ रुपयांच्या किंमतीत ऑनलाइन रिचार्ज करू शकता. किंवा च्या स्टोरवर जाऊन हा प्लान खरेदी करू शकता. ऑनलाइन रिचार्ज करण्यासाठी My BSNL App किंवा कंपनीची वेबसाइटचा वापर करु शकता. वाचाः १ जून पासून प्लानमध्ये झाले हे बदल BSNL च्या या प्रीपेड डेटा रिचार्ज प्लान सोबत आता ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय ४ दिवसांसाठी एक्स्ट्रा वैधता दिली जात आहे. तर या प्लानमध्ये मिळणारी बीएसएनएल ट्यून्स ऑफरचा फायदा ग्राहकांना मिळणार नाही. या प्लानमध्ये करण्यात आलेला बदल १ जून २०२१ पासून करण्यात आला आहे. वाचाः BSNLचा १९८ रुपयांचा डेटा पॅक सोबत आता काय काय मिळणार बीएसएनएलच्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये रोज २ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 40 Kbps होते. प्लानची वैधता ५० दिवसांची आहे. यात कोणतीही कॉलिंग सुविधा नाही. आता या प्लानमध्ये फ्री लोकधुन कंटेंटचे अॅक्सेस दिले जाणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p6MYlD