Full Width(True/False)

सोशल मीडियावर सगळं हॉट लागतं, असं म्हणणाऱ्या युझरला जुई गडकरीचं सणसणीत उत्तर

मुंबई: अभिनेत्री जुई गडकरी सध्या मालिकांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. दिवसभरातील अनेक गोष्टी जुई चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असली तरी अनेकांनी तिला तिच्या फोटोंवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. नेहमी मराठमोळा आणि सोज्वळ अशा लुकमधील फोटो शेअर करत असल्यानं अनेक युझर्सकडून जुईला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. परंतु या युझर्संना तिने तिच्या कडक शब्दांत सडेतोड उत्तरं दिली आहेत. तिच्या या उत्तरांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर जर तुला टिकायचं असेल तर, तुला वाद विवाद करणे आवश्यक आहे. अलका कुबल यांच्या सारखं राहशील तर तुझ्याकडे ढुंकूनही पाहाणार नाही. सोज्वळ स्वभाव इकडे चालत नाही. इथे सगळं कसं हॉट पाहिजे असतं...असं एका युझरनं लिहिलं होतं. या युझरला जुईनं चांगलंचं सुनावलं आहे. ' तुमच्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. पण मला 'हॉटनेस'मध्ये जास्त रस नाहीए. ज्यांना मी आवडते ते नक्की पाहातील माझ्याकडे. तुम्हाला शुभेच्छा!, असं जुईनं म्हटलं आहे. 'पुढचं पाऊल', 'वर्तुळ' यासारख्या मालिका आणि 'बिग बॉस'सारख्या रिअॅलिटी शोमधून जुई घराघरात पोहचली आहे. तिच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल तिनं अद्यापही काही घोषणा केली नसली तरी पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3p77QsK