Full Width(True/False)

WhatsApp वर ब्लॉक झाला असाल तर नो टेन्शन; ‘ही’ ट्रिक वापरून करता येईल मेसेज

नवी दिल्ली : मित्रांपासून ते नातेवाईकांपर्यंत सर्वांशीच बोलण्यासाठी चा वापर करतोच. मात्र, अनेकदा समोरची व्यक्ती रागात करते. यामुळे त्या व्यक्तीपर्यंत आपले बोलणे पोहचत नाही व समस्या निर्माण होते. जर तुम्हालाही WhatsApp वर ब्लॉक केले असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला अशाच दोन सोप्या ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही ब्लॉक झाल्यानंतर देखील समोरील व्यक्तीला मेसेज करू शकता. वाचाः ग्रुप बनवा – या पद्धतीने ब्लॉक केलेल्या व्यक्तीशी बोलण्यासाठी तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागेल. तुमच्या मित्राला सांगून एक WhatsApp ग्रुप ग्रुप बनवा. यात तुम्हाला व ज्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे, त्याला अ‍ॅड करा. यानंतर तुमचा मित्र ग्रुपमधून लेफ्ट होऊ शकतो. आता तुम्ही थेट ग्रुपमध्ये मेसेज करू शकता. तुम्ही ग्रुपमध्ये जे मेसेज केले आहेत ते ब्लॉक केलेल्या व्यक्तीला दिसतील. या पद्धतीने तुम्ही तुमचे म्हणणे त्या व्यक्तीपर्यंत पोहचवू शकाल. वाचाः अकाउंट डिलीट करावे लागेल –
  • या दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला WhatsApp अकाउंट डिलीट करून पुन्हा Sign Up करावे लागेल. यानंतर तुम्हाला ब्लॉक केलेल्या व्यक्तीला थेट मेसेज करू शकता.
  • सर्वात प्रथम WhatsApp मध्ये सेटिंग्स पर्यायावर जाऊन Account वर क्लिक करा.
  • येथे 'Delete My Account' पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुमचा देशाचा कोड (भारतासाठी +९१) आणि मोबाइल नंबर टाका.
  • यानंतर 'Delete My Account' बटनवर क्लिक करून अकाउंट डिलीट करू शकता.
  • अकाउंट डिलीट केल्यानंतर तुमचे अकाउंट पुन्हा नव्याने सुरू करा.
  • अशा पद्धतीने तुम्ही ब्लॉक ऑप्शनला बायपास कराल व ज्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे, त्याला मेसेज करू शकता.
मात्र, ही पद्धत वापरताना लक्षात ठेवा की अकाउंट डिलीट केल्याने तुमचे सर्व चॅट देखील डिलीट होईल. तुम्ही पूर्ण बॅकअप गमावू शकता. त्यामुळे कोणती पद्धत वापरायची, हे तुम्ही ठरवू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fDMlgj