मुंबई : सोशल मीडियावर अभिनेत्री खूपच सक्रीय असते. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यानंतर कंगना आता आणखी एका प्रभावी महिला नेत्याची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाची तयारी तिने सुरू केली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर प्रोस्थेटिक मेकअप करतानाचे फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. कंगना साकारतेय कंगनाने आतापर्यंत विविध चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या या भूमिका चाहत्यांना आवडल्या आहेत. अभिनयाबरोबरच कंगना आता दिग्दर्शकाच्या भूमिकेतही दिसत आहे. कंगनाचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारीत आहे. यामध्ये कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. या सिनेमावर काम सुरू झाले आहे. या सिनेमासाठी म्हणून कंगनाने प्रोस्थेटिक मेकअप करतानाचे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले आहे, 'प्रत्येक भूमिका साकारण्याआधीचा प्रवास देखील तितकाच महत्त्वाचा आणि मनोरंजक असतो. आज आम्ही संपूर्ण शरीर, चेहऱ्यावर प्रोस्थेटिक मेअकप केला. त्याचसोबत या सिनेमातील कलाकारांवर चर्चा करत आगामी सिनेमा इमर्जन्सी, इंदिरा गांधी यावर काम करायला सुरुवात केली आहे. या सिनेमामध्ये लुक अतिशय अचूक असावा, यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. आपले स्वप्न मोठ्या पडद्यावर उतरवण्यासाठी अनेक कलाकार एकत्रीतपणे मेहनत घेत आहेत. मणिकर्णिका प्रॉडक्शनसाठी हा सिनेमा खूपच खास असणार आहे.' अनेक प्रोजेक्टवर कंगनाचे काम सुरूकंगना याआधी मणिकर्णिका सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने झाशीच्या राणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत 'थलायवी' सिनेमातही तिने काम केले आहे. हा सिनेमा २३ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. परंतु करोनामुळे देशात लॉकडाउन लागू झाले. त्यामुळे सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा सिनेमा आता ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत. थलायवीशिवाय कंगना धाकड सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमामध्ये कंगना एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले असून यात अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांचीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. याशिवाय कंगना तेजस या सिनेमातही दिसणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gUWXI9