मुंबई: अभिनेता आणि यांचा 'ओह माय गॉड’;चित्रपट बराच गाजला होता. चित्रपटात सर्व धर्मातील अनिष्ट प्रथांवर भाष्य करणारा होता. चित्रपटात अक्षय कुमार भगवान श्री कृष्णाच्या अवतारात दिसला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. म्हत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात परेश रावल दिसणार नाहीत. अभिनेता पंकज त्रिपाठीनं परेश रावल यांना रिप्लेस केल्याच्या चर्चा सुरू आहेत. या सिक्वेल चित्रपटाचं शूटिंग येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.पहिल्या भागात अक्षयचा जसा लुक आणि त्याची जी भूमिका ती सिक्वेलमध्येही कायम राहणार आहे. फक्त परेश रावल यांच्या जागी आता दिसणार आहे. परेश रावल, अक्षयकुमार जोडीचा 'ओह माय गॉड', आमीर खानचा ‘पीके’ हे सिनेमे खूप गाजले. या सिनेमातून धर्माच्या होणाऱ्या बाजारीकरणावर नेमकं बोट ठेवण्यात आलं होतं. दोन्ही सिनेमाची कथानकं थोडी वेगळी होती. पण लोकांवर धर्माचा पगडा किती आणि कसा असतो याबाबतीत समाजाला आरसा दाखवण्याचं काम या दोन्ही सिनेमांनी केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34JxTNk