नवी दिल्ली : टेक कंपनी सध्या M-सीरिजचा नवीन Samsung Galaxy M32 वर काम करत आहे. या फोनबाबत अनेक रिपोर्टसमोर आले आहे. आता स्मार्टफोनला म्हणजेच FCC च्या वेबसाइटवर पाहण्यात आले आहे. या आधी डिव्हाइसचे सपोर्ट पेज कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह झाले होते. वाचाः एका रिपोर्टनुसार, अपकमिंग स्मार्टफोन SM-M325F मॉडेल नंबरसोबत एफसीसी वेबसाइटवर लिस्ट आहे. लिस्टिंगनुसार स्मार्टफोन १५ वॉट रॅपिड चार्जिंगसोबत येईल. मात्र, लिस्टिंगमध्ये अन्य फीचर्सबद्दल माहिती मिळालेली नाही. लिस्टिंगमुळे फोन लवकरच जागतिक बाजारात लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Samsung Galaxy M32 ची संभाव्य किंमत सॅमसंगने अद्याप Samsung Galaxy M32 स्मार्टफोनच्या लाँचिंग अथवा किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, लीक रिपोर्टनुसार, फोनची किंमत १५ ते २० हजार रुपये असेल. सोबतच, अनेक रंगांच्या पर्यायासोबत फोनला लाँच केले जाईल. वाचाः Samsung Galaxy M32 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन अँड्रायड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि मीडियाटेक हीलियो जी८० प्रोसेसर मिळेल.यात ६००० एमएएचची बॅटरी मिळू शकते. सॅमसंगने एप्रिलमध्ये Samsung Galaxy F12 स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत १०,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.५ इंच एचडी+ इनफिनिटिव्ह व्ही डिस्प्ले मिळतो. याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आणि रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये इन-हाउस ८nm Exynos ८५० SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रायड ११ वर चालतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pzGcVM