नवी दिल्ली. आजच्या काळात आधार कार्ड प्रत्येकजण वापरतो. सध्याच्या जवळ- जवळ सर्व कागदपत्रांशी त्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे संबंध येतोच. आधार कार्डची कधीही आणि कोठेही आवश्यकता भासू शकते. परंतु, आधार कार्ड प्रत्येक वेळी जवळ असेलच असे नाही. शिवाय, अनेकदा लोकांना आपल्या आधार क्रमांकाबद्दल माहिती मिळाली तर ते त्याचा गैरवापर देखील करू शकतात. वाचा : अशात, आधार कार्डचा व्हर्च्युअल आयडीचा पर्याय यूआयडीएआयने जारी केला आहे. हा आयडी देखील १६ क्रमांकाचा आहे. हा आयडी बँकिंगपासून सर्व प्रकारच्या सुविधांसाठी वैध मानला जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी ही आयडी बदलू शकता. कसा Generet करायचा वर्च्युअल आयडी जाणून घ्या या टिप्सच्या माध्यमातून. ऑनलाईन असा तयार करा आधार व्हर्च्युअल आयडी
- यासाठी प्रथम यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर https://ift.tt/2gSWiG8 वर जावे लागेल.
- यानंतर My aadhar वर जाऊन व्हर्च्युअल आयडी जनरेटरवर क्लिक करा.
- नंतर एक पेज उघडेल. यामध्ये आपल्याला आपला १६ अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
- नंतर कॅप्चा व्हेरीफाय करून प्रविष्ट करा आणि सेंड ओटीपी वर क्लिक करा.
- यानंतर ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येईल जो तुम्हाला प्रविष्ट करावा लागेल.
- त्यानंतर जनरेट व्हीआयडी पर्यायावर क्लिक करा.
- मग आपल्याला जेनरेट केलेल्या व्हीआयडीचा मेसेज प्राप्त होईल.
- नवीन व्हर्च्युअल आयडी तयार होईपर्यंत हा व्हर्च्युअल आयडी वैध असेल.
- दुसरा व्हर्च्युअल आयडी तयार होईपर्यंत आधार व्हर्च्युअल आयडी वैध राहील.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hYdGus