Full Width(True/False)

Twitter वर लवकरच मिळणार डिसलाइक बटन, कंपनी करत आहे टेस्टिंग

नवी दिल्ली : माइक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर डिसलाइक बटनचे आणावे, अशी मागणी यूजर्स अनेक दिवसांपासून करत आहे. आता कंपनी लवकरच हे फीचर आणण्याची शक्यता असून, डिसलाइक बटनचे टेस्टिंग सुरू केले आहे. डिसलाइक बटनचे टेस्टिंग सध्या मोबाइल अ‍ॅपमध्ये केले जात आहे. वाचाः च्या आयओएस बीटा यूजर्सला स्वरूपात आणि downvote चा पर्याय मिळत आहे. हे दोन्ही बटन ट्विटच्या खाली दिसतील. कंपनीचे म्हणणे आहे की, downvotes बटन सार्वजनिकपणे दिसणार नाही. लाइक स्वरूपात upvotes बटन दिसेल. कंपनी लाइक बटनच upvote स्वरुपात बदलण्याची शक्यता आहे. Twitter चे प्रोडक्ट प्रमुख Kavyon Beykpour यांनी गेल्यावर्षीच सांगितले होते की, कंपनी लवकरच डिसलाइक बटन आणणार आहे. ट्विटरने देखील अधिकृत हँडलद्वारे या फीचरबाबत माहिती दिली आहे. वाचाः Downvotes चा पर्याय केवळ रिप्लायला दिसेल, मुख्य ट्विटसोबत दिसणार नाही. याप्रकारचे फीचर आधीपासूनच आणि वर उपलब्ध आहे. यूट्यूबवर देखील डिसलाइक बटन आहे. ट्विटरने म्हटले आहे की, या फीचरचे सध्या टेस्टिंग सुरू असून, याला अधिकृत समजू नये. दरम्यान, आणखी एका नवीन फीचरचे टेस्टिंग करत असून, यात थेट गुगल अकाउंटवरून लॉगइन करणे शक्य होईल. हे फीचर सर्वात आधी अँड्राइड यूजर्ससाठी येईल. बीटा व्हर्जनवर याचे टेस्टिंग सुरू आहे. या अपडेटमुळे यूजर्सला लॉगइन करणे सोपे जाईल. काही बीटा यूजर्ससाठी हे फीचर उपलब्ध देखील झाले आहे. रिपोर्टनुसार, या नवीन फीचरला बीटा व्हर्जन v९.३.०-beta.०४ वर पाहण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rqmmgt