नवी दिल्ली. प्राइम डे सेलचे आयोजन २६ आणि २७ जुलै रोजी भारतात करण्यात आले आहे. हा सेल भारतातील प्राइम डे इव्हेंट चा पाचवा वर्धापन दिन असून त्यात विविध प्रकारची डील आणि आकर्षक सवलत देण्यात येणार आहेत. हा सेल दोन दिवसीय सेल २६ जुलै रोजी सकाळी १२ वाजता (मध्यरात्री) IST वाजता सुरू होईल आणि २७ जुलै रोजी संपेल. या दरम्यान, अनेक श्रेण्यांमधील प्रोडक्ट्सवर मस्त डील्स आणि मोठी सूट देण्यात येणार आहे. यात ३०० हून अधिक नवीन प्रोडक्ट्स देखील लाँच करण्यात येणार आहे वाचा: सेलमध्ये लॉन्चपॅड, सहेली, Amazon आणि आर्टिसॅनवरील स्थानिक दुकाने यासारख्या बर्याच प्रोग्रामच्या विक्रेत्यांच्या उत्पादनांवर डील्स मिळतील. दोन दिवसांच्या या सेलमध्ये तयारीसाठी, Amazon वर मोठ्या संख्येने लहान विक्रेते ८ जुलै ते २४ जुलै पर्यंत ग्राहकांसाठी डील्स तयार करणार आहेत. अॅमेझॉनने म्हटले आहे की, यात प्राइम मेंबर नवीन लाँच आणि बर्याच उत्तम डील्सची अपेक्षा करू शकतात. यामध्ये स्मार्टफोन, टीव्ही, उपकरणे, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, अॅमेझॉन उपकरणे यासारख्या उत्पादनांचा समावेश असेल. एसएमबीनी ८ जुलै, ५.०० IST ते २४ जुलै, ११:५९ IST पर्यंत ऑफर करण्यात येणार असलेल्या प्रॉडक्ट्सची खरेदी प्राइम मेंबर्सही करु शकतात आणि प्राइम डे खरेदीवर १५० रुपयांपर्यंत १० टक्के कॅशबॅक मिळवू शकतात. सेलच्या दिवशी सदस्यांना एचडीएफसी बँक डेबिट, क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर १० टक्के त्वरित सूट मिळेल. यापूर्वी प्राइम डे सेलचे आयोजन जून महिन्यात करण्यात आले होते. परंतु, कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे सेल पुढे ढकलण्यात आला. आता कंपनीने नवीन तारीख दिली आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yJmABT