Full Width(True/False)

भन्नाट! ‘या’ कंपनीच्या प्लानमध्ये मिळेल तब्बल ३३०० जीबी डेटा, किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी

नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने () आपल्या ग्राहकांसाठी खास स्वस्त री-लाँच केला आहे. कंपनीने आपला सर्वात लोकप्रिय प्रमोशनल भारत फायबर (एफटीटीएच) ब्रॉडबँड प्लान – फायबर बेसिक, फायबर वॅल्यू, फायबर प्रीमियम आणि फायबर अल्ट्राला सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये ६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या ब्रॉडबँड प्लानची किंमत ४४९ रुपये आहे. वाचा: BSNL चा ४४९ रुपयांचा फायबर बेसिक प्लान ४४९ रुपयांचा फायबर बेसिक प्लान कंपनीच्या सर्वात लोकप्रिय प्लान पैकी एक आहे. रिपोर्टनुसार, बीएसएनएलने या प्लानमध्ये मोठा बदल केला आहे. आता हा प्लान निवडणाऱ्या ग्राहकांना ६ महिन्यानंतर फायबर बेसिक प्लस ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये मायग्रेट होण्याची आवश्यकता नसेल. ग्राहक आपल्या गरजेनुसार तोच प्लान सुरू ठेवू शकतील. फायबर बेसिक प्लानसाठी तुम्ही वार्षिक शुल्क देखील भरू शकता. यामुळे तुम्हाला १२ महिन्यांच्या रिचार्जमध्ये १३ महिन्यांचा फायदा मिळेल. या प्लानचा फायदा ६ ऑक्टोबरपर्यंतच घेता येईल. वाचा: BSNL ४९९ रुपयांच्या प्लानमधील अन्य फायदे या प्लानमध्ये यूजर्सला ३०एमबीपीएसच्या स्पीडने ३३०० जीबी डेटा दिला जात आहे. FUP लिमिट समाप्त झाल्यानंतर २एमबीपीएस स्पीड मिळेल. या प्लान अंतर्गत भारतात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. BSNL ने परत लाँच केला ३९८ चा प्लान BSNLने काही दिवसांपूर्वीच आपला ३९८ रुपयांचा लोकप्रिय प्लान परत आणला आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा, कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस मिळतात. प्लानची वैधता ३० दिवस आहे. यूजर्स कोणत्याही मर्यादेशिवाय डाउनलोड आणि अपलोड्स करू शकतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hLOu9o