Full Width(True/False)

Canon पासून Nikon पर्यंत या ठिकाणी मिळताहेत सेकंड हँड DSLR कॅमेरे, पाहा किंमत

नवी दिल्लीः DSLR कॅमेराची फीचर्स लपून राहिलेले नाहीत. असंख्य तरुणांना फोटोग्राफीसाठी या कॅमेराची गरज आहे. कारण, डीएसएलआरने फोटो जबरदस्त येतात. परंतु, DSLR कॅमेऱ्याची किंमत खूप असते. काही लोकांना कॅमेऱ्याची आवड असते परंतु, खरेदीसाठी हे कॅमेरे महाग असल्याने अनेक जण याचा पर्याय शोधतात. तो म्हणजे, सेकंड हँड कॅमेरे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कॅमेऱ्या बद्दल माहिती देत आहोत. जे सेकंड हँड असून ओएलएक्सवर लिस्टेड आहेत. या कॅमेऱ्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजायची गरज पडणार नाही. जाणून घ्या यासंबंधी डिटेल्स. वाचाः कॅनोन ईओएस ५५०डी डिजिटल कॅमेरा हा कॅमेरा फ्लिपकार्टवर ५० हजार ४३५ रुपयांना मिळत आहे. परंतु, सेकंड हँड मार्केट अॅप OLX वर ३२ हजारात खरेदी करू शकता. OLX वर सेलरने याची माहिती दिली आहे हा कॅमेरा १८ ते १३५ एमएम आयएस लेन्स आमि कॅनोन ७५-३०० यूएसएम ३ लेन्स सोबत येतो. यासोबत अनेक अॅक्सेसरीज मिळते. निकॉन डी ३१०० DSLR कॅमेरा हा कॅमेरा दोन लेन्स सोबत २२ हजार रुपयांत खरेदी करता येतो. हा कॅमेरा OLX वर लिस्टेड आहे. या कॅमेरासोबत रेग्युलर १८-५५ एमएम लेन्स आणि लांब असलेले फोटो शूट करता येतात. यासाठी या कॅमेरात ७०-३०० एमएम टामारो लेन्स दिला आहे. यात एक ट्राईपॉड आणि १ निकॉनची बॅग दिली जात आहे. सेलरच्या माहितीनुसार, यात अन्य अॅसेसरीज उपलब्ध आहे. कॅनोन १३००डी सेकंड हँड किंमत OLX वर या कॅमेराला खरेदी करू शकता. या कॅमेरात १८-५५ लेन्स मिळतो. सेलरने या कॅमेराची किंमत २३ हजार रुपये ठेवली आहे. यात सेलरकडून अनेक फोटो सुद्धा पोस्ट केली आहे. ज्यात कॅमेरा सोबत पाहिले जावू शकते. यात चार्जर आणि बॅटरी सह अन्य अॅक्सेसरीज दिली आहे. निकॉन डी३००० ची किंमत या सेकंड हँड मार्केट मध्ये OLX वर खरेदी करू शकता. सेलरकडून याचे अनेक फोटो पोस्ट करण्यात आली आहेत. ज्यात सर्व अक्सेसरीजसह एक फ्लॅश लाइट दिली आहे. सेलरने सांगितले की, हे कधी कधी काम करीत नाही. याशिवाय, यात ७० ते ३०० झूम लेन्स दिली आहे. सल्लाः OLX वर काहीही खरेदी करण्याआधी त्याच्यासंबंधी सर्व माहिती चांगल्या पद्धतीने आधी समजून घ्या. त्यानंतर त्या व्यक्तीशी संपर्क साधा. प्रोडक्ट्सला चांगले तपासून पाहिल्यानंतर व्यवहार पूर्ण करा. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VKmkEB