नवी दिल्ली. करोना काळात लोकांची कमाईची पद्धत देखील बदलली आहे. भारतातील करोनाच्या दुसर्या लाटेत अनेकांना त्यांची नोकरी गमवावी लागली. आणि आता तिसरी लाट येण्याची देखील दाट शक्यता आहे. अशात तुम्ही घरी बसून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर आम्ही त्याबद्दल पूर्ण माहिती आणि काही ट्रिक्स सांगत आहोत. तुमच्याकडे काही काही स्किल्स असतील तर, तुम्ही सहज ऑनलाइन सोशल मीडिया आणि वेबसाइटद्वारे घर बसल्या पैसे कमवू शकता. वाचा: कन्टेन्ट रायटिंग जर तुम्हाला लिखाणाची विशेष आहे आणि व्याकरणाची चांगली समाज आहे. तर, तुम्ही कन्टेन्ट रायटिंगच्या माध्यमातून खूप पैसे कमावू शकता. मराठी ,हिंदी आणि इंग्रजीसह बर्याच प्रादेशिक भाषांमध्ये स्वतंत्ररित्या काम करण्यास सुरुवात करू शकता. यासाठी लेखनाची क्षमता आणि सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. हे काम सुरू करायचे असल्यास यासाठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीची आवश्यकता नाही. अनेक कंपन्या लेखकांना त्यांच्या आवश्यतकतेनुसार कन्टेन्ट रायटिंगची कामं देतात. ब्लॉग ऑनलाइन पैसे कमावणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्हाला होस्टिंग, थीम आणि डोमेन खरेदी करावे लागतील. सुरुवात ब्लॉग सुरु करण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. सर्वप्रथम अनेक मीडियम्स वर लिहायला सुरुवात करा. नंतर माध्यम भागीदार कार्यक्रम मॉनेटाईझ करा. या व्यतिरिक्त आपण ब्लॉगर किंवा वर्डप्रेसमध्येही मोफत ब्लॉग तयार करू शकता. ब्लॉगवरील ट्रॅफिकनुसार ब्लॉगिंगमध्ये पैसे येतात. जर तुम्ही ब्लॉगद्वारे एखादे प्रोडक्ट विकले तर तुम्ही त्यातून देखील पैसे मिळवू शकता. अफिलेट मार्केटिंग सर्वप्रथम, आपल्याला यासाठी फ्लिपकार्ट आणि Amazon सारख्या ऑनलाइन रिटेल विक्रेत्यांशी भागीदारी करण्याची आवश्यकता आहे. यातून तुम्ही त्यांच्या प्रोडक्ट्सचा प्रचार करू शकाल. तुमच्या वेबसाइट आणि सोशल मीडिया अॅप्सद्वारे देखील हे करू शकता. कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन व्यवसायात बसत असल्यामुळे तेथे एक वेगळा प्रकार आहे. आपल्याकडे वेबसाइट नसली तरीही एफिलिएट मार्केटिंगमधून पैसे कमवू शकता. उदाहरण द्यायचे झाले तर, तुमच्या आवडीच्या पुस्तकाची लिस्ट तयार करून ती फ्लिपकार्ट सोबत लिंक करू शकता. म्हणजे लोक ते पुस्तक खरेदी करू शकतील आणि तुम्हाला सुद्धा कमिशन मिळेल. फेसबुक आणि इन्स्टाग्राम तुम्ही ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातूनही अधिकाधिक पैसे कमवू शकता. फेसबुकवर ट्विट किंवा पोस्टसाठी तब्बल १० हजार ते २० हजार रुपये कमवू शकता. यासाठी सोशल मीडियावर मोठा फॅन बेस असणे आवश्यक आहे. अशात , या डोमेनशी संबंधित लोक सोशल मीडिया अॅप्सवर त्यांच्या पेजला मॉनेटाईज करू शकतात. युट्युब युजर्स यूट्यूबवरून लाखो रुपये कमवितात. पण, हे सोपे काम नाही. जे व्हिडिओ रेकॉर्ड आणि अपलोड करू शकतात त्यांच्यासाठी हे फार कठीणही नाही. तुम्ही सुद्धा सहजपणे एक YouTube चॅनेल तयार करू शकता. उदाहरणार्थ, आपल्याला मजेदार व्हिडिओ बनविण्याची आवड असेल तर आपण असे व्हिडिओ YouTube वर अपलोड करू शकता आणि त्यातून पैसे कमवू शकता. तर, विद्यार्थी, गृहिणी आणि इतर लोक युजर्सठी चांगले, महत्त्वपूर्ण आणि कामी येतील असे व्हिडिओ बनवू शकतात. त्यासाठी सर्व प्रथम, तुम्हाला व्हिडिओ तयार करण्यासाठी काय आवश्यक आहे ते समजून घ्यावे लागेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hYvZzX