नवी दिल्लीः देसी कंपनी मायक्रोमॅक्सने आधीच नवीन स्मार्टफोनची ३० जुलै रोजी घोषणा केली आहे. वरून ३० जुलै रोजी पडदा हटणार आहे. हा फोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या कंपनीच्या In 1B या स्मार्टफोनचे अपग्रेड व्हेरियंट आहे. PriceBaba नावाच्या टिप्स्टरकडून हा खुलासा करण्यात आला आहे. या डिव्हाइस मध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. हँडसेट मध्ये पुढील बाजुस एक वॉटरड्रॉप नॉच दिली जाणार आहे. लीकच्या माहितीनुसार, फोनमध्ये Unisoc T610 चिपसेट दिली आहे. वाचाः या स्मार्टफोनच्या नवीन इन २ बी स्मार्टफोनमध्ये गेल्या वर्षीच्या १ बी ची झलक दिसणार आहे. इन १ बी मध्ये मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर दिला होता. तर नवीन फोनमध्ये Unisoc T610 चिपसेट मिळणार आहे. हा एक मोठा अपग्रेड नाही आहे. डिव्हाइसला ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज सोबत सिंगल व्हेरियंट मध्ये लाँच केले जावू शकते. या फोन मध्ये कॅमेरा म्हणून १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला जाणार आहे. फोनच्या मागील बाजुस सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे. वाचाः हा फोन अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टम सोबत येईल. हँडसेट मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. जी १० वॉट चार्जिंग सपोर्ट करेल. मायक्रोमॅक्स इन १ बी ला ६ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमती सोबत लाँच करण्यात आले होते. या सीरीजच्या नवीन फोनला सुद्धा याच किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनची सर्व माहिती ३० जुलै रोजी स्पष्ट होणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UwaOwh