Full Width(True/False)

राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये पोलिसांना सापडलंय गुप्त कपाट, अनेक खुलासे होण्याची शक्यता

मुंबई: पॉर्नोग्राफी प्रकरणात बिझनेसमन आणि अभिनेत्री यांची चौकशी अद्याप सुरुच आहे. पोलीस तपासात अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा झाला आहे. १९ जुलैला राज कुंद्राला अटक झाल्यानंतर आता त्याची पोलिस कोठडी २७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. अशात आता राज कुंद्राची कंपनी विआन इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये पोलिसांना एक गुप्त कपाट सापडलं आहे. मात्र या कपाटात राज कुंद्रानं नेमकं काय काय लपवून ठेवलं होतं याचा खुलासा मात्र होऊ शकलेला नाही. न्यूज एजन्सी ANI च्या ट्वीटनुसार, मुंबई पोलिसांच्या काही सूत्रांनी माहिती दिली आहे की, अंधेरी येथील राज कुंद्राची कंपनी विआन इंडस्ट्रीज आणि जेएल स्ट्रीमच्या ऑफिसमध्ये क्राइम ब्रांचला एक गुप्त कपाट सापडलं आहे. या कपाटातून पोलिसांनी काही महत्त्वाची कागदपत्रं जप्त केल्याचं बोललं जात आहे. राज कुंद्राच्या ऑफिसची झडती घेण्याआधी पोलिसांनी शिल्पा आणि राजच्या जुहू येथील घराचीही झडती घेतली होती. यावेळी पोलिसांनी शिल्पाची तब्बल ६ तास चौकशी करून तिचं स्टेटमेंट लिहून घेतल्याचं बोललं जात आहे. रिपोर्ट्सनुसार शिल्पानं पती राज कुंद्रावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हॉटशॉट्सवर प्रसारित करण्यात आलेले व्हिडिओ हे पॉर्न नाही तर एरॉटिका व्हिडिओ असल्याचं तिनं म्हटलं आहे. पॉर्न आणि एरॉटिका दोन्हीमध्ये फरक असतो आणि पोलीस ज्या कंपनीबद्दल बोलत आहेत ही कंपनी राज कुंद्रा नाही तर त्याच्या बहिणीचा नवरा चालवत असल्याचंही तिने सांगितलं. या सर्व प्रकरणात आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचं शिल्पाचं म्हणणं आहे. दरम्यान राज कुंद्रानं देखील स्वतःवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यानं मुंबई उच्च न्यायालयात, आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा बेकायदेशीर असल्याचं अपील केलं आहे. अशात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत राज कुंद्राची पोलीस कोठडी २७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज कुंद्रा चौकशी दरम्यान सहकार्य करत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WhHTfU