नवी दिल्ली : चॅटिंगसाठी जगभरात सर्वाधिक वापर चा केला जातो. याच्या लोकप्रियतेमागे अनेक कारणं आहेत. यातील एक याचा साधा इंटरफेस हे देखील आहे. WhatsApp मध्ये तसे ३ टॅब दिसतात, मात्र याच्या आत अनेक फीचर्स आहेत. काही फीचर्स डिफॉल्ट सेट असतात, तर काही फीचर्स WhatsApp सेटिंग्समध्ये जाऊन सुरू करावे लागतात. या फीचर्सबद्दल सर्वांनाच माहिती नसते. अशाच WhatsApp च्या काही फीचर्सबद्दल जाणून घेऊया. वाचाः WhatsApp प्रोफाइल फोटो प्रत्येकजण पाहणार नाही WhatsApp प्रोफाइल इतरांपासून लपवायचे असेल तर यूजर्सला सर्वात आधी WhatsApp सेटिंग्समध्ये जावे लागेल. येथे अकाउंटवर गेल्यावर प्रायव्हेसीवर क्लिक करा. यानंतर प्रोफाइल फोटो सिलेक्ट करा. यात तीन पर्याय दिसतील. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यातील एक पर्याय निवडू शकता. अनोळखी लोकांपासून फोटो लपवण्यासाठी My Contacts पर्याय निवडू शकता. वाचाः WhatsApp वर लपवू शकता खासगी चॅट WhatsApp मध्ये पर्सनल चॅटला स्क्रीनवरून हाइड करता येते. यासाठी अर्काइव्ह चॅट्सचा पर्याय आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही पर्सनल चॅटला स्क्रीनवरून काढू शकता. या फीचरच्या मदतीने तुम्हाला खासगी चॅटला इतरांपासून लपवता येईल. चॅट वेगळे करण्यासाठी WhatsApp ने इतर पर्याय दिलेला नाही. एकाच ठिकाणी पाहा ब्लॉक लिस्ट तुम्हाला जर ब्लॉक केलेली कॉन्टॅक्ट लिस्ट पाहायची असेल, तर यासाठी सेटिंग्समध्ये एक पर्याय मिळतो. सेटिंग्समध्ये अकाउंटलवर क्लिक केल्यानंतर प्रायव्हेसीचा पर्याय निवडा. यानंतर खाली Blocked Contact चा पर्याय दिसेल. यावर केल्यानंतर कोणाला ब्लॉक केले आहे ते दिसेल. तुम्ही येथून अनब्लॉक देखील करू शकता. या फीचर्सचा वापर तुम्ही WhatsApp वेबवर देखील करू शकता. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xGb0Y7