Full Width(True/False)

सुंदर पिचाईंचे मजेशीर ट्विट, पाहा का म्हणाले मला सर्फिंग शिकण्याची गरज?

नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकांनी इंटरनेट कनेक्शन नसल्यावर वेळ घालवण्यासाठी क्रोम ब्राउजरवर डायनॉसोरचा खेळला असेल. गुगलचे सीईओ यांनी देखील वेळ घालण्यासाठी हा गेम खेळून बघितला व जिंकण्यासाठी नक्कीच एक-दोनदा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांचे लक्षात आले. याबाबत त्यांनी ट्विटरवर देखील अनुभव शेअर केला. सोबतच, गेमचा फोटो शेअर करत ‘मला कदाचित माझ्या सर्फिंग स्किलवर काम करण्याची गरज आहे’, असल्याचे ते म्हणाले. वाचा: फोटोमध्ये टी-रेक्सच्या पायाखाली लाल रंगाचा सर्फबोर्ड दिसत आहे. ला सुरुवात झाल्याने याचा समावेश करण्यात आला आहे. या गेममध्ये तुम्हाला धावणाऱ्या टी-रेक्सला कंट्रोल करायचे असते. गेममध्ये हाय-स्कोर करण्यासाठी कोणत्याही अडथळ्याला न धडकता खेळत राहायचे असते. टी-रेक्स अडथळ्यांवरून उडी मारू शकतो, मात्र यासाठी वेळ खूपच महत्त्वाची आहे. तुम्हाला काही सेकंदाचा जरी विलंब झाला तरी तुम्ही अडथळ्याला धडकता व खेळ तेथेच थांबतो. जेवढा वेळ टी-रेक्स धावतो, तेवढा हाय-स्कोर करू शकता. वाचा: ट्विटमध्ये टी-रेक्स सर्फिंग करताना दिसत आहे व समुद्रातील अडथळे पार करत आहे. गेममध्ये रनिंगच्या तुलनेत सर्फिंग नक्कीच अवघड आहे. टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात झाल्याने गुगलने dino गेममध्ये काही नवीन गोष्टींचा समावेश केला आहे. आता टी-रेक्स ऑलिम्पिक टॉर्च देखील घेऊ शकतो. यामध्ये डायनॉसोरला सर्फिंग करताना नवीन अडथळ्यांचा सामना करावा लागेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eNM5dO