स्मार्टफोन आता आपल्या कोणत्याही कामासाठी महत्त्वाचा भाग झाला आहे. फोन खरेदी करताना आपण जास्त स्टोरेज, पॉवरफूल बॅटरी, शानदार डिस्प्ले असेल असे फोन खरेदी करतो. जास्त स्टोरेज असलेला फोन खरेदी केल्यास गेम खेळताना व फोटो-व्हिडीओ सेव्ह करण्यास देखील अडचण येत नाही. तुम्ही जर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येणारे स्मार्टफोन्स शोधत असाल तर विवोकडे अनेक चांगले पर्याय आहे. स्मार्टफोन कंपनी विवोकडे ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजसह कमी किंमतीत येणारे अनेक शानदार फोन्स आहेत. या स्टोरेजमुळे कोणतेही काम करताना अडथळा जाणवत नाही. यामध्ये लेटेस्ट अँड्राइडसह फास्ट प्रोसेसर देखील मिळतो. या फीचर्ससह तुम्हाला Vivo S1Pro, Vivo V20 2021, Vivo V21 5G, Vivo X60 आणि Vivo Y51A सारखे दमदार स्मार्टफोन्स मिळतील. या स्मार्टफोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Vivo S1Pro
Vivo S1Pro स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. यात ६.३८ इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. विवोच्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. यात ४५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ ऑक्टा कोर प्रोसेसर मिळतो. या फोनला २ हजार रुपये डिस्काउंटसह १८,९९० रुपयात खरेदी करू शकता.
Vivo V20 2021
Vivo V20 2021 स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंच फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर आणि फनटच ओएस ११ मिळतो. यामध्ये ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ४४ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. यात ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनला ७ हजार रुपये डिस्काउंटसह २२,९९० रुपयात खरेदी करता येईल.
Vivo V21 5G
या फोनमध्ये ६.४४ इंच एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ६४+८+२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप आणि ४४ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. यात देखील ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. फोनमध्ये मीडियाटेकचा ८००यू प्रोसेसर मिळेल. हा फोन अँड्राइड ११ वर काम करतो. यात ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. Vivo V21 5G ३ हजार रुपये डिस्काउंटसह २९,९९० रुपयात मिळेल.
Vivo X60
6.56 इंच एमोलेड डिस्प्लेसह येणाऱ्या या फोनचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० ऑक्टाकोर प्रोसेसर मिळतो. पॉवरसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४३०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळतो. विवोच्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सल मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर सेटअप आणि फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फोनसाठी ३७,९९९ रुपये मोजावे लागतील. यावर ५ हजार रुपये सूट मिळेल.
Vivo Y51A
कमी बजेट आणि शानदार फीचर्ससह येणाऱ्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर सेटअप मिळेल. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. विवोच्या या फोनमध्ये ६.५८ इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. ५००० एमएएचच्या दमदार बॅटरीसह येणाऱ्या विवोच्या या स्मार्टफोनला ४ हजार रुपये डिस्काउंटसह १७,९९० रुपयात खरेदी करता येईल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x3RZ0m