नवी दिल्ली. तुम्हाला देखील वनप्लस ब्रँड स्मार्टफोन आवडत असेल पण, एरवी बजेटमुळे खरेदी करणे शक्य होत नसेल तर तुमच्याकडे मस्त संधी आहे. २६ जुलैपासून Amazon सेलमध्ये स्वस्तात खरेदी करता येणार आहे. हा सर्वात स्वस्त वनप्लस मोबाइल आहे, जो तुम्हाला सेलमध्ये आणखी स्वस्त मिळेल, म्हणजेच हा हँडसेट खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला फार खर्च करावा लागणार नाही. वाचा: OnePlus Nord CE 5G वैशिष्ट्य डिस्प्ले आणि सॉफ्टवेअरः OnePlus Nord CE 5G मध्ये ६.४३ इंच (२४००x१०८० पिक्सेल) फ्लूइड एमोलेड डिस्प्ले, ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि ४१० पिक्सल प्रति इंच पिक्सेल आकारमान आहे. हा वनप्लस मोबाइल Android ११ वर चालतो. OnePlus Nord CE 5G प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेजः वेग आणि मल्टीटास्किंगसाठी या वनप्लस फोनमध्ये ८ जीबी / १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी / २५६ जीबी स्टोरेज ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसरसह आहे. OnePlus Nord CE 5G कॅमेरा: बॅक पॅनलवर फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ४५०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी 30 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वनप्लस स्मार्टफोनची लांबी १५९.२ मिमी, रुंदी ७३.५ मिमी आणि जाडी ७.९ मिमी आणि वजन १७० ग्रॅम आहे. OnePlus Nord CE 5G किंमत भारतात OnePlus Nord CE 5G चे ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट सध्या २४,९९९ रुपयांना विकले जात आहे. पण, अॅमेझॉन प्राइम डे सेल २०२१ मध्ये तुम्ही हा हँडसेट २२,९९९ रुपयांना खरेदी करू शकता, म्हणजेच २००० रुपयांची बचत. प्रोडक्ट्सवर सवलती व्यतिरिक्त तुम्हाला अतिरिक् बचत करायची असल्यास अमेझॉन सेलमध्ये एचडीएफसी बँक डेबिट / क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनद्वारे तुम्हाला पेमेंटवर १० टक्के त्वरित सूट देखील मिळू शकते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iFx2Ux